-
भारताचा तरुण फलंदाज शुभमन गील हा टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग नाहीय.
-
युएईमधील विश्वचषक स्पर्धेमध्ये संघात स्थान मिळालेलं नाही आणि कोणतीही घरगुती स्पर्धा सध्या सुरु नाही म्हणून शुभमन घरी निवांत आराम करत आहे.
-
मात्र असं असतानाही तो चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याने पोस्ट केलेला एक फोटो.
-
शुभमनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो पोस्ट केल्याने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आणि सारा तेंडुलकरच्या कथित नात्याची चर्चा सुरु झालीय.
-
हो.. हो.. सचिनची मुलगी असणाऱ्या सारा तेंडुलकरसोबतच शुभमनचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आता रंगतायत.
-
कोलकाताचा दमदार फलंदाज आणि टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल आणि सारा हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरूय.
-
सौंदर्याच्या बाबतीत सारा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असल्याचे तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यावर दिसून येते.
-
सचिनची लेक सारा ही शिक्षणासाठी लंडनमध्ये असते. मात्र ती सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रीय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
तर दुसरीकडे शुभमन गील हा भारताच्या सध्याच्या युवा खेळाडूंपैकी एक आहे.
-
भविष्यात भारतीय संघाची जबाबदारी ज्या सक्षम खांद्यांवर असेल अशा खेळाडूंच्या यादीमध्ये शुभमनचं नाव घेतलं जातं.
-
शुभमनने भारताकडून एकदिवसीय सामने आणि कसोटी सामने खेळले असले तरी अद्याप त्याने टी-२० मध्ये देशाकडून खेळताना मैदानात पाऊल ठेवलेलं नाही.
-
कसोटी क्रिकेटमध्ये आठ सामन्यांमध्ये त्याने ४१४ धावा केल्या असून तो सालामीचा फलंदाज म्हणून कामगिरी बजावतो.
-
नुकत्याच ऑस्ट्रेलियातील गाबा खेळपट्टीवर झालेल्या सामन्यात त्याने केलेली कामगिरी चर्चेत राहिली होती.
-
शुभमने भारताकडून तीन एकदिवसीय सामने खेळलेत.
-
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातून आयपीएलमध्ये खेळणारा शुभमन एक उत्तम सलामीवीर आहे.
-
शुभमनने दिलेल्या योगदानामुळेच संघ यंदा अंतिम सामन्यापर्यंत पोहचू शकला.
-
आयपीएलमधील त्याने गोलंदाजीची पिसं काढल्याचं पहायला मिळालं होतं.
-
मात्र आता त्याची चर्चा एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे आणि त्याच्या खासगी आयुष्यातील घटनेसंदर्भात आहे आणि ज्याचा संबंध थेट सारा तेंडुलकरशी जोडला जातोय. नक्की काय घडलंय पाहुयात…
-
शुभमनचं नाव अनेकदा सचिन तेंडुकलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. या दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगताना दिसतात.
-
मात्र दोघांनी कधीही सार्वजनिकपणे याबद्दल भाष्य केलेलं नाही.
-
उलट दोघेही एकमेकांच्या पोस्ट आणि फोटो इन्स्टाग्रामवर लाईक करत असतात.
-
सारा ही शुभमन आणि त्याच्या बहिणीला इन्स्टाग्रामवर फॉलो करते.
-
आता या दोघांचं नातं चर्चेत आलं आहे ते शुभमनने पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये त्याने घातलेल्या टीशर्टवर असलेल्या ओळीमुळे.
-
हो फोटो पाहून शुभमनचं साराबरोबर ब्रेकअप झालं आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडल्याचं दिसत आहे.
-
शुभमनच्या या फोटोमधील कॅप्शनऐवजी त्याने घातलेला टी-शर्टच जास्त चर्चेत आहे. तो फोटो काय आहे आणि त्या टी-शर्टवर काय लिहिलंय पाहुयात…
-
शुभमनने स्वत:चा आरशात पाहतानाच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याने घातलेल्या टी शर्टच्या मागील बाजूस ‘don’t fall in love with angels’असं वाक्य लिहिण्यात आलं आहे.
-
याचं वरवर भाषांतर करायचं झाल्यास एखाद्या परीच्या प्रेमात पडू नका असं करता येईल. पण शुभमन नक्की या फोटोमधून काय सांगू पाहतोय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
-
एकाने बाहुबलीमधील संवादाच्या आधारे डिंडोरा पिटवा दो मामा गिलचं ब्रेकअप झालं आहे, अशी कमेंट केलीय.
-
आता शुभमनला खरोखरच यामधून काही सांगायचं आहे की चाहत्यांनी भलताच अर्थ काढलाय हे शुभमनलाच सांगता येईल.
-
सारा लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते त्यामुळे ती आता या फोटोवर काही कमेंट करते हा याबद्दलही काही चाहत्यांना उत्सुक्ता लागून राहिलेली आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

“रेल्वेने गेलेल्या, कधीही विमानात न बसलेल्या लोकांना विमानातून परत आणलं”, शिंदे गटाच्या खासदाराच्या विधानाची चर्चा