-
भारताने शुक्रवारी अवघ्या ३९ चेंडूंमध्ये लक्ष्य काढून स्कॉटलंडला पराभूत
-
रवींद्र जडेजाच्या (३/१५) प्रभावी फिरकीनंतर के. एल. राहुलने (१९ चेंडूंत ५० धावा) केलेल्या आतषबाजीच्या बळावर भारताने स्कॉटलंडचा तब्बल आठ गडी आणि ८१ चेंडू राखून फडशा पाडला.
-
स्कॉटलंडचा ८५ धावांत खुर्दा केल्यानंतर भारताने निव्वळ धावगतीच्या शर्यतीत अफगाणिस्तानला मागे टाकण्यासाठी निर्धारित लक्ष्य ७.१ षटकांत गाठणे गरजेचे होते.
-
परंतु राहुल आणि रोहित शर्मा (१६ चेंडूंत ३० धावा) यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताने ६.३ षटकांतच विजय मिळवला.
-
कर्णधार विराट कोहलीने वाढदिवशी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
-
जडेजा आणि शमी यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवून स्कॉटलंडचा डाव १७.४ षटकांत ८५ धावांत गुंडाळला.
-
या सामन्यामध्ये लाजीरवाणा पराभव झाला असला तरी स्कॉटलंडचा संघ पहिल्यांदाच भारताविरोधात खेळत असल्याने त्यांनी हा सामना शिकण्याच्या हिशोबाने आणि अभनुभव म्हणून स्वीकारत पराभव मान्य केला.
-
मात्र मैदानामध्ये एकतर्फी सामना झाल्यानंतर मैदानाहबाहेर म्हणजेच ड्रेसिंगरुममध्ये एक वेगळीच गोष्ट पहायला मिळाली.
-
स्कॉटलंडच्या संघाने भारतीय संघाला त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
-
भारतीय संघानेही अगदी एखाद्या दादा संघाप्रमाणे या संघातील खेळाडूंचं आपल्या ड्रेसिंग रुममध्ये स्वागत केलं.
-
कर्णधार विराट कोहलीसोबत स्कॉटलंडच्या अनेक खेळाडूंनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
-
रोहित शर्माकडूनही स्कॉटलंडच्या खेळाडूंनी काही बॅटींग टीप्स घेतल्या.
-
विराट, रोहित सारेच अगदी मनापसाून या खेळाडूंशी सामन्याबद्दल चर्चा करताना बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटो, व्हिडीओत दिसत आहे.
-
काहींनी तर थेट मेन्टॉर असणाऱ्या धोनीसोबत आपले क्रिकेटचे अनुभव आणि समस्या शेअर केल्याचं पहायला मिळालं.
-
धोनीसुद्धा अगदी गांभीर्याने सामन्यासंदर्भातील चर्चा करताना फोटो, व्हिडीओंमध्ये दिसतोय.
-
कोहली खेळाडूंना काही गोष्टी समजून सांगता दिसतोय. भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीचं कौतुक केलं जात आहे.
-
कोहलीच नाही तर भारताचा सालामीवीर के. एल. राहुलने आपल्या जोरदार फटकेबाजीसंदर्भात चर्चा करताना दिसतोय.
-
केवळ फलंदाजीचेच नाही तर गोलंदाजीचे धडेही स्कॉटलंडच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंकडून घेतले.
-
अश्विन, बुमराहसारख्या खेळाडूंकडून स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी सल्ले घेतले.
-
क्रिकेट स्कॉटलंडने कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांचे आभार मानलेत.
-
थेट दिग्गजांकडून मार्गदर्शन मिळाल्याबद्दल क्रिकेट स्कॉटलंडने समाधान व्यक्त केलंय. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो