-
टी २० वर्ल्डकपमध्ये नामिबिया विरुद्धच्या शेवटच्या सामन्यानंतर प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे. वर्ल्डकपनंतर होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. (Photo- BCCI)
-
रवि शास्त्री यांना २०१७ मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. रवि शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने कसोटीत चांगली कामगिरी केली. मात्र आयसीसी स्पर्धांमध्ये अपयश पदरी पडलं. (Photo- AP)
-
रवि शास्त्री आणि विराट कोहली जोडी भारताल आयसीसी किताब जिंकून देण्यात अपयशी ठरले. भारताला एकदिवसीय वर्ल्डकप २०१९ च्या उपांत्य फेरीत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ च्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्याचबरोबर टी २० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत उपांत्य फेरीही गाठू शकले नाहीत. (Photo- Indian Express)
-
रवि शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटीच्या दोन मालिकेत पराभूत यशस्वी ठरला. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली. तर भारतीय संघ आपल्या देशात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला मात देण्यात यशस्वी ठरला. (Photo- BCCI)
-
रवि शास्त्री आपला कार्यकाळ संपल्यानंतर आयपीएलच्या नव्या संघासोबत काम करण्याची शक्यता आहे. नव्या अहमदाबाद संघासोबत काम करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहमदाबाद फ्रेंचाइसी त्यांच्याशी संपर्क साधल्याचं सांगण्यात येत आहे. (Photo- Reuters)
-
रवि शास्त्री यांनी टीम इंडियासाटी ८० कसोटी आणि १५० एकदिवस सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रवि शास्त्री यांनी जवळपास ७००० धवा केल्या आहेत. तसेच २८० गडी बाद केले आहेत. (Photo- AP)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”