-
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांच्यावरुन सोशल मीडियावर शेअर केले जात असलेल्या मीम्सबद्दल माहिती आहे असे म्हटले. यात काही अडचण नाही, माझ्या खर्चावर लोक हसत असतील तर चांगली गोष्ट असल्याचे रवि शास्त्रींनी म्हटले आहे.
-
रवि शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा करार ICC T20 वर्ल्ड 2021 सह संपला आहे. (Source: Reuters)
-
रवि शास्त्रींच्या जागी राहुल द्रविडची भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तो १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेची जबाबदारी स्वीकारणार आहे.
-
भारतीय संघाचा टी २० विश्वचषकाचा प्रवास नामिबियाविरुद्ध नऊ विकेटने विजय मिळवून संपला आहे
-
शास्त्रींना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मीम्सबद्दल विचारण्यात आले तेव्हा ५९ वर्षीय त्यांनी मजेदार उत्तर दिले आहे.
-
“हे मजेदार आहे. चला, माझ्या खर्चावर मजा करा. यावर मी हसून म्हणेन की माझ्या नावाने एक पेग घ्या,” असे रवि शास्त्री म्हणाले. (Source: PTI Photo)
-
मी लिंबूपाणी प्यायलो काय आणि दूधासोबत मध प्यायलो काय. काय फरक पडतो? तुम्ही माझ्या खर्चाने मजा करा ना, असा सल्ला रवि शास्त्रींनी दिला (File Photo/BCCI)
-
रवि शास्त्री यांच्यावरुन मद्यपानाबद्दल सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत असतात.(फोटो सौजन्य- सोशल मीडियावरुन साभार)
-
जेव्हा तुम्ही असे मीम्स शेअर करता तेव्हा किती लोक हसतात, किती लोक आनंदी होतात. त्याचा आनंद घ्या. जोपर्यंत टीम चांगली कामगिरी करत आहे तोपर्यंत मी आनंदी आहे, असे शास्त्री म्हणाले.
-
संघावर होणाऱ्या टीकेबाबत शास्त्री म्हणाले, चांगले काम करा, तुमची प्रशंसा होईल आणि जर तुम्ही चांगली कामगिरी केली नाही तर तुम्हाला लाथा आणि ठोसे मिळतील.

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार