-
सुपर १२ फेरीत ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून जिंकला. (AP Photo)
-
सुपर १२ फेरीतील दुसरा सामना श्रीलंकेशी झाला. श्रीलंकेनं विजयासाठी दिलेलं आव्हान ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून पूर्ण केलं. (AP Photo)
-
ऑस्ट्रेलियाला सुपर १२ च्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने पराभूत केलं. इंग्लंडने ८ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. (AP Photo)
-
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून बांगलादेशचा धुव्वा उडवला. (AP Photo)
-
उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. (Reuters)
-
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानचं दोन विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. (AP Photo)
-
अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी आणि ७ चेंडू राखून पराभव केला. ११ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी २० चा वर्ल्डकप जिंकला. (Photo-ICC Twitter)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”