-
टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ गड्यांनी धूळ चारत विश्वविजेतेपद मिळवले.
-
टी-२० प्रकारात प्रथमच ऑस्ट्रेलिया संघ विश्वविजेता ठरला.
-
न्यूझीलंडच्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक ठोकले.
-
वॉर्नर बाद झाल्यानंतर मिचेल मार्शने नाबाद ७७ धावांची खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेल २८ धावांवर नाबाद राहिला. १९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विश्वविजेते बनवले.
-
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल मार्च-एप्रिलमध्ये पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकेल की नाही याबद्दल सांगता येत नाही. कोविड-१९ मुळे मॅक्सवेल आणि त्याची होणारी पत्नी विनी रमन यांचे लग्न बऱ्याच दिवसांपासून रखडले आहे.
-
मॅक्सवेल आणि विनी रमन यांची मार्च २०२० मध्ये एंगेजमेंट झाली. आता पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकू शकतात, असे बोलले जात आहे.
-
दोघे डिसेंबर २०१३ च्या सुमारास मेलबर्न स्टार्स इव्हेंटमध्ये भेटले होते. २०१७पासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. मॅक्सवेलने विनीला प्रपोज केले.
-
ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या तमिळ कुटुंबातील विनी रमनने व्हिक्टोरियातील मेंटन गर्ल्स सेकंडरी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तिने मेडिकल सायन्समध्ये आपले शिक्षण पूर्ण केले असून ती या क्षेत्रातच प्रॅक्टिस करत आहे.
-
मॅक्सवेल आणि विनी दोघांनाही प्रवास करायला आवडते. या जोडप्याला एकत्र प्रवास करायला आवडते आणि ते पॅरिस, लंडन, डब्लिन, न्यूझीलंड आणि इतर अनेक देशांमध्ये फिरायला गेले होते.
-
या दोघांच्या लग्नानंतर भारतीय मुलीशी लग्न करणारा मॅक्सवेल दुसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरेल. याआधी माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने २०१४ मध्ये प्रसिद्ध भारतीय मॉडेल माशूम सिंघाशी लग्न केले.
भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल