-
कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने आणलेली दोन महागडी घड्याळं जप्त केली आहेत.
-
हार्दिक पंड्याच्या या घडळ्यांची किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे.
-
विश्वचषक स्पर्धेसाठी पांड्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये होता. तिथून परत येताना विमानतळावर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
-
हार्दिक पंड्याला आलिशान घड्याळांची फार आवड असल्याचं सर्वांना माहितीय.
-
त्याच्याकडे पाटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११ सहीत इतरही काही महागडी घड्याळं आहेत.
-
मागील वर्षी हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पांड्यासुद्धा महागडं घड्याळ आणल्याप्रकरणी कस्टमच्या कारवाईत अडकला होता.
-
कृणालने महागडी घड्याळं आणल्याचं कस्टमला कळवलं नव्हतं. त्यानंतर त्याची घड्याळं ताब्यात घेण्यात आली होती.
-
स्टाईल स्टेटमेंटमध्ये महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या घड्याळाची क्रेझ अनेकांना असते.
-
भारतीय क्रिकेट संघात फक्त हार्दिक पंड्याच नाही तर विराट कोहली, धोनीसहित अनेकांना महागड्या घड्याळांची आवड आहे. त्यांच्या या घड्याळांची किंमत लाखोंमध्ये आहे.
-
विराट कोहली : Rolex घड्याळ किंमत – ८,६०,७०० रुपये
-
महेंद्रसिंह धोनी : Panerai Radiomir California घड्याळ किंमत – ९,२५,००० रुपये
-
कृणाल पांड्या : Classic Rolex Cosmograph Daytona Rainbow Yellow Gold Oyster घड्याळ किंमत – ९०,००,००० रुपये
-
के. एल. राहुल : Silver Patek Philippe Nautilus घड्याळ किंमत – ३७,५०,००० रुपये
-
रोहित शर्मा : Rolex Sky-Dweller घड्याळ किंमत – १०,७०,००० रुपये
-
हार्दिकच्या या घड्याळाची किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन