-
यूएईमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भाग घेऊन भारतात परतणाऱ्या क्रिकेटपटू हार्दिक पंड्यावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली. रविवारी रात्री पंड्याच्या ताब्यातून दोन महागडी घड्याळे सापडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी पंड्याला मुंबई विमानतळावर थांबवले.
-
अधिकाऱ्यांनी पंड्याला घड्याळांबाबत विचारणा केली असता, तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही असे. हार्दिक घड्याळांचे बिलही दाखवू शकला नाही, त्यानंतर विभागाने दोन्ही घड्याळे जप्त केली असे वृत्त समोर आले.
-
“मी दुबईमधून“मी माझ्यासोबत आणलेले सर्व सामान मी घोषित केले. मी जे कायदेशीर दुबईमधून विकत घेतले होते आणि त्या वस्तूंवर जे काही शुल्क आकारले जाईल ते भरण्यास सहमती दर्शविली. सीमाशुल्क विभागाने मला वस्तू खरेदी करण्यासाठी कागदपत्रे मागितली आणि ती सादर करण्यात आली. या वस्तूंच्या शुल्काचे मूल्यमापन सीमाशुल्क विभाग करत असून, जे काही शुल्क असेल ते मी भरेन, असे मी आधीच सांगितले आहे. सोशल मीडियावर दावा केल्यानुसार घड्याळाची किंमत पाच कोटी नाही तर सुमारे १.५ कोटी रुपये आहे,” असे पंड्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
-
यानंतर हार्दिककडे असणाऱ्या घड्याळांबाबत चर्चांना उधाण आले. हार्दिकला महागडी घड्याळे घालण्याचा छंद आहे आणि त्याच्याकडे आधीच करोडो रुपयांची घड्याळे आहेत.
-
1. patek philippe nautilus 5712R – हार्दिकचे हे घड्याळ पूर्णपणे प्लॅटिनमचे बनलेले आहे. या घड्याळावरील तासाचे चिन्ह पाचूचे बनलेले आहेत, ज्यामुळे डायलची रचना आकर्षक आहे. या घड्याळांची किंमत ५ कोटींच्या वर आहे.
-
2. Audemars Piguet Royal Oak Selfwinding Chronograph Rose Gold – हार्दिकच्या या घड्याळाची किंमत ३८ लाख रुपये आहे. या घड्याळात १८ कॅरेट सोन्याचे काम करण्यात आले आहे. ज्यामध्ये सोन्याचे टोन्ड कोटिंग करण्यात आले आहे.
-
3. Audemars Piguet Royal Oak Offshore 18K Rose Gold – हार्दिकच्या या घड्याळाची किंमत ८५ ते ९५ लाख इतकी आहे.
-
4. Rolex Day-Date 40mm President – हार्दिककडे रोलेक्स हा घड्याळाचा महागडा ब्रँडही आहे. या घड्याळात सोनेरी पेव्ह डायल आणि रुबी बेझल आहे. या घड्याळाची किंमत ८९ लाख इतकी आहे.
-
5. Patek Philippe 5740 Nautilus – हार्दिक पंड्याकडे त्याच्या महागड्या मनगटी घड्याळांमध्ये Patek Philippe 5740 Nautilus Calendar घड्याळ आहे. तांत्रिकतेच्या विशिष्ट मिश्रणासह आणि स्पोर्ट्स टचसह, या घड्याळामध्ये २४० Q हालचालीच्या सेल्फ-वाइंडिंग कॅलिबरसह अल्ट्रा-थिन सारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याची अंदाजे किंमत सुमारे १ कोटी इतकी आहे.

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार