-
जयपूरच्या मैदानामध्ये बुधवारी पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये पाहुण्या संघात एका अशा खेळाडूचा सामावेश होता की ज्याच्या नावामुळे त्याची भारतीय चाहत्यांमध्ये फार चर्चा झाली.
-
या खेळाडूचं नाव त्याच्या कामगिरीपेक्षा अधिक चर्चेत राहिलं तो खेळाडू आहे रचिन रवींद्र.
-
अर्थात रचिनला या सामन्यामध्ये फारशी संधी मिळाली नाही. मात्र रोहितला बाद करण्यामध्ये त्याने झेल पकडून महत्वाचा वाटा उचलला.
-
१८ व्या षटकामध्ये रचिन फलंदाजीला आला.
-
मात्र रचिन मोठा फटका मारण्याच्या नादात ८ चेंडूंमध्ये सात धावा करुन बाद झाला.
-
रचिन हा अष्टपैलू खेळाडू असून तो डावखुऱ्या हाताने फलंदाजी आणि फिरकीपटू म्हणून संघाच्या कामगिरीमध्ये योगदान देतो.
-
कालच्या सामन्यातील रचिनच्या खेळापेक्षा त्याच्या नावाची आणि त्या नावामागील गोष्ट अधिक रंजक आहे.
-
अर्थात नावावरुन लक्षात आलं असेल त्याप्रमाणे रचिन हा मूळचा भारतीय वंशाचा खेळाडू आहे.
-
रचिनचे वडील रवि कृष्णमूर्ती हे सॉफ्टवेअर सिस्टीम आर्किटेक्ट आहेत. बंगळुरु जन्म झालेले रवि आणि त्यांची पत्नी दीपा हे दोघे न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले आहेत.
-
रचिनचा जन्म १९९९ साली न्यूझीलंडमधील वेलिंगटनमध्ये झालाय.
-
आज म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी रचिनचा २२ वा वाढदिवस आहे.
-
याच वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये रचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
-
रचिनने बांगलादेशविरोधातील टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल ठेवलं.
बांगलादेशविरुद्धच्या या मालिकेत तो पाच टी-२० सामने खेळला. -
रचिन हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. बांगलादेशविरोधात त्याने सहा विकेट्स घेतल्या मात्र त्याला पाच सामन्यांमध्ये केवळ ४७ धावा करता आल्या.
-
फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवता न आल्यानेच त्याला टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळालं नाही.
-
रचिनचे वडील रवि हे क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत. तसेच ते भारताचा माजी क्रिकेपटू जवागल श्रीनाथचे चांगले मित्रही आहेत. रवि आणि श्रीनाथ यांनी बंगळुरुकडून स्थानिक स्तरावर काही सामने एकत्र खेळलेत.
-
त्यामुळेच रचिनही वयाच्या अगदी १३ व्या वर्षापासून स्पर्धात्मक क्रिकेट स्पर्धा खेळतोय.
-
रचिन श्रीनाथला श्री अंकल असं म्हणतो. अनेकदा ते क्रिकेट या विषयावर गप्पा मारतात, असं रचिनने एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
-
रवि आणि त्यांची पत्नी हे भारतीय क्रिकेटचे आणि त्यातही सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे मोठे चाहते आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलाचं नाव रचिन असं ठेवलं आहे. यामधील र हा राहुलमधला आहे तर चिन हे सचिनमधील आहे.
-
वयाच्या १६ व्या वर्षीच रचिनने २०१६ च्या आयसीसीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकामध्ये भाग घेतला होता.
-
त्यावेळी रचिन सर्वात कमी वयामध्ये न्यूझीलंडसाठी खेळणारा खेळाडू ठरला होता.
-
रचिन २०१८ साली अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप खेळला आहे.
-
तसेच भारत अ संघाने २०१९-२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान खेळलेल्या सराव कसोटीमध्ये रचिन शुभमन गिलसारख्या खेळाडूंविरोधात खेळलाय. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश