-
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन टी-२० सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात झाली आहे. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५ गडी राखून पराभव केला.
-
या विजयासह भारताचा नवा टी-२० कप्तान रोहित शर्माने आपल्या नव्या इंनिंगची दमदार सुरुवात केली.
-
तर, पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या खात्यातही पहिला विजय नोंदवला गेला. द्रविडपुढे आता भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपदे मिळवून देण्याचे आव्हान असेल. द्रविडसह भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये देखील बदल झाले आहेत.
-
विक्रम राठोड – २०१९मध्ये इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वनडे वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांच्या जागेवर माजी क्रिकेटपटू विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली होती. टी-२० वर्ल्डकपनंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. मात्र, त्यांनी आणखी काही काळ आपण भारतीय संघासोबत काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या कार्यकाळानंतर पुन्हा एकदा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा भारतीय संघासोबत काम करण्याची संधी देण्यात आली.
-
टी. दिलीप – आर. श्रीधर यांच्यानंतर रिक्त झालेल्या भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाच्या जागेसाठी अभय शर्मा व टी. दिलीप यांच्यामध्ये स्पर्धा होती. मात्र, टी. दिलीप यांनी ही शर्यत जिंकली. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मागील दोन वर्षापासून दिलीप काम करत आहेत. यावर्षी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली होती.
-
पारस म्हांब्रे – पारस म्हांब्रे द्रविडचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. मागील अनेक वर्षांपासून द्रविडसोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, भारत अ आणि १९ वर्षाखालील संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले माजी कसोटीपटू पारस म्हांब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी भरत अरुण त्यांची जागा घेतली.

Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार