-
ऑस्ट्रेलिया संघाचा क्रिकेटपटू टिम पेनने सेक्सटींग (Sexting Scandal) प्रकरणामध्ये नाव पुढे आल्यानंतर कर्णधार पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. आपल्या एका सहकाऱ्यासोबत खासगी संवाद साधताना वापरलेल्या अश्लील भाषेमुळे वादात सापडल्यानंतर पेनने कर्णधार पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
-
पेनची पत्नी बोनी पेनने पहिल्यांदाच पतीच्या कृत्याबद्दल विधान केले आहे. तिने आपल्या पतीला आधीच माफ केले असल्याचे सांगितले. हे प्रकरण २०१७ चे आहे आणि त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट तस्मानियाच्या चौकशीत त्याला क्लीन चिट मिळाली आहे.
-
बोनी म्हणाली, हे प्रकरण पुन्हा समोर आणणे ‘अयोग्य’ आहे. पेनने महिलेला अश्लील फोटो आणि अश्लील संदेश पाठवल्याबद्दल खेद व्यक्त केला होता.
-
बोनी आणि टिमचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. दोघांना दोन मुले आहेत. मी या प्रकरणी आधीच माझा राग व्यक्त केला होता. आम्ही भांडलो आणि बोललो. त्यानंतर आम्ही ते मागे सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला, असे बोनीने सांगितले.
-
“कोणीही परिपूर्ण नसतो. तुम्हाला लोकांना दुसरी संधी द्यावी लागेल. मी आधी म्हटल्याप्रमाणे, टिमने येऊन मला सर्व काही सांगितले आणि त्याला याची गरज नव्हती. मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे. प्रेमाचा प्रश्न कधीच नाही; आम्ही नेहमीच एकमेकांवर मनापासून प्रेम केले आहे”, असेही बीनीने म्हटले.

५ एप्रिल पंचांग: दुर्गाष्टमीला कोणत्या राशीवर होणार माता लक्ष्मीची अपार कृपा; कोणाच्या पदरी पडणार सुख, शांती आणि धन; वाचा तुमचे राशिभविष्य