-
टी-२० विश्वचषक संपल्यानंतर इंग्लिश क्रिकेटर सॅम बिलिंग्सने गर्लफ्रेंडशी साखरपुडा केला आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. बिलिंग्सने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळला.
-
बिलिंग्सची गर्लफ्रेंड सारा केंटले ही टेनिसपटू आहे, तिने तिच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ती मानसशास्त्रातही पदवीधर आहे.
-
सॅम आणि सारा यांनी मालदीवमध्ये हा साखरपुडा केला.
-
बिलिंग्सने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये साराने रिंग घातलेली दिसत आहे. यासोबतच त्याने कॅप्शन लिहिले, ”होणारी मिसेस बिलिंग्स. जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती.”
-
टी-२० विश्वचषकातील बिलिंग्सच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.
-
२०१८ साली आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जने बिलिंग्सला १ कोटी रुपयांची किंमत मोजून करारबद्ध केले होते. यानंतर बिलिंग्सने चेन्नईसाठी १० सामने खेळले, ज्यात त्याने १०८ धावा केल्य़ा. २०२० हंगामासाठी चेन्नईने त्याला करारमुक्त केले.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स