भारताने रविवारी कोलकात्यामध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पाहुण्या संघांचा ७३ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यानंतर कर्णधार रोहितने केलेली एक कृती सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. -
कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक (३१ चेंडूंत ५६ धावा) आणि अक्षर पटेलसह (३ गडी) गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला.
-
या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.
-
कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर झालेल्या अखेरच्या टी-२० सामन्यात यजमान भारताने १८५ धावांचं आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवलं होतं.
-
भारताने दिलेल्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १७.२ षटकांत १११ धावांतच आटोपला.
-
या विजयासहीत भारताने तीन सामन्यांची ही मालिकाही जिंकली.
-
त्यामुळे रोहित आणि राहुल द्रविड या नव्या कर्णधार-प्रशिक्षक पर्वाचीही मालिका विजयाने सुरुवात झाली.
-
प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.
-
न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिलने एकाकी झुंज देताना ३६ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली. मात्र फिरकीपटूंसमोर न्यूझीलंडच्या संघाने नांगी टाकली.
-
भारताकडून डावखुरा फिरकीपटू अक्षरने अवघ्या नऊ धावांत तीन गडी बाद केले.
-
त्याला हर्षल पटेलने दोन, तर दीपक चहर, यजुर्वेंद्र चहल आणि वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी एक बळी घेत उत्तम साथ दिली.
-
त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकांत ७ बाद १८४ अशी धावसंख्या उभारली.
-
के. एल. राहुलच्या जागी सलामीला आलेल्या इशान किशन (२९) आणि रोहित यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करत ६.२ षटकांत ६९ धावांची सलामी दिली.
-
रोहितने ५६ धावांची खेळी करताना सलग दुसरे अर्धशतक नोंदवले. आधी फलंदाज आणि नंतर गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केल्याने भारताचा विजय सुखकर झाला.
-
मधल्या फळीतील श्रेयस अय्यर (२५), वेंकटेश (२०) आणि चहर (नाबाद २१) यांच्या योगदानामुळे भारताने १८० धावांचा टप्पा ओलांडला.
-
या विजयानंतर रोहितने केलेली एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या विजयानंतर रोहित शर्माने टी-२० चा पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्यांदाच विजयी चषक हाती घेतला.
-
मात्र त्यानंतर रोहितने चषक संघ सहकाऱ्यांच्या हाती दिला आणि तो संघाचा फोटो काढताना अगदी एका बाजूला कोपऱ्यात उभा राहिला.
-
रोहितने चषक तरुण खेळाडूंच्या हाती सोपवत त्यांना फोटोच्या मध्यभागी उभं करुन स्वत: मात्र फोटोसाठी उजव्या कोपऱ्यात उभा राहिलेला.
-
रोहितच्या या कृतीमुळे अनेकांना महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली.
-
धोनीने अनेकदा अशाप्रकारे स्पर्धा जिंकल्यानंतर चषक संघ सहकाऱ्यांच्या, तरुण खेळाडूंच्या हाती देऊन फोटोमध्ये बाजूला उभं राहणं पसंत केल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.
-
विराटही कर्णधार म्हणून धोनीची ही स्टाइल फॉलो करायचा. आता रोहितही विराट आणि धोनीची हीच स्टाइल फॉलो करताना दिसतोय. (सर्व फोटो ट्विटवरुन साभार)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश