-
भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.
-
उन्मुक्तने सिमरन खोसलासोबत २१ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली.
-
सिमरन ही फिटनेस ट्रेनर आणि पोषणतज्ज्ञ आहे.
-
अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.
-
सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे.
-
२८ वर्षीय उन्मुक्तला अमेरिकेतील ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळायचे असल्याने त्याने भारतीय क्रिकेटशी संलग्न सर्व क्रिकेट प्रकाराला अलविदा केला.
-
२०१२मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत चंदच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपदावर नाव कोरले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम फेरीत चंदनेच नाबाद १११ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती.
-
परंतु चंदला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नाही.
-
चंदने ६७ प्रश्रम श्रेणी सामन्यांत आठ शतक आणि १६ अर्धशतकांसह ३,३७९ धावा केल्या.
-
‘आयपीएल’मध्ये त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताचे दिल्ली कॅपिटल्स), मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले.
-
परंतु ‘आयपीएल’सह अन्य स्थानिक स्पर्धामध्ये सातत्याने छाप पाडण्यात अपयशी ठरल्यामुळे भारताकडून सामना खेळण्याची संधी त्याच्या वाट्याला आलीच नाही.
-
अमेरिकेत उन्मुक्तने दमदार सुरुवात करत आपला नवा प्रवास सुरू केला.
-
आता त्याने आणखी एक खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे.
-
बिग बॅश लीगमध्ये (BBL) सामील होणारा तो पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : उन्मुक्त चंद / इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”