-
आपल्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदने गर्लफ्रेंड सिमरन खोसलासोबत लग्न केले.
-
लग्नानंतर दोन दिवसांनी पत्नीला सोडून तो ऑस्ट्रेलियाला निघून गेला आहे.
-
काही काळापूर्वी उन्मुक्तने वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि तो अमेरिकेत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. तो फक्त लग्नासाठी भारतात आला होता आणि लग्नानंतर लगेचच बिग बॅश लीग खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला.
उन्मुक्तची पत्नी सिमरनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नवऱ्याला गुड बॉय मेसेज देत एक फोटो शेअर केला आहे. तिने त्याला विमानतळावर सोडले आणि नंतर मिठी मारली. -
बिग बॅश संघ मेलबर्न रेनेगेड्सने उन्मुक्त चंदला करारबद्ध केले आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू दीर्घ काळापासून महिला बिग बॅश लीगसह जगभरातील देशांतर्गत लीगमध्ये खेळत आहेत, परंतु भारतातील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पुरुष खेळाडूंना परदेशात क्रिकेट खेळण्याची परवानगी नाही.
-
बिग बॅश लीगमध्ये (BBL) सामील होणारा उन्मुक्त पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे.
-
उन्मुक्तने ६७ कसोटीत ३१.५७च्या सरासरीने ३३७९ धावा केल्या. त्याने या फॉरमॅटमध्ये आठ शतके आणि १६ अर्धशतके केली. याचबरोबर त्याने १२० लिस्ट ए सामन्यांमध्ये ४५०५ धावा केल्या. येथे त्याच्या नावावर सात शतके आणि ३२ अर्धशतके होती. उन्मुक्तने ७७ सामन्यांमध्ये तीन शतके आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने १५६५ धावा केल्या. २०१२चा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकल्यानंतर तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ धावांची नाबाद खेळी केली आणि भारताला विश्वचषक जिंकून दिला.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती