-
भारतीय कसोटी संघाचा कप्तान विराट कोहली मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर फलंदाजीचा सराव करत आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली दीर्घ रजेवर गेला होता. तो न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतही खेळला नाही.
-
सध्या कानपूर येथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत तो खेळत नसला, तरी मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विराट संघात परतणार आहे.
-
यासाठी विराट जोरदार सराव करत आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर विराट दिग्गज प्रशिक्षक संजय बांगर यांच्याकडून बॅटिंग टिप्स घेत आहे.
-
विराट कोहलीने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक केले. त्यानंतर कोलकाता येथे बांगलादेशविरुद्धच्या पिंक बॉल कसोटीत त्याने शतक झळकावले.
-
तेव्हापासून त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) त्याला शतक झळकावता आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्ध शतकाचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट प्रयत्न करणार आहे. (सर्व फोटो ट्विटर आणि सोशल मीडियावरून साभार)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली