-
भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने पुन्हा एकदा भारतीय संघात पाऊल ठेवले आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडने आपल्या जबाबदारीची सुरुवात विजयाने केली. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने न्यूझीलंडला टी-२० मालिकेत हरवले.
-
द्रविडचे अनेक चाहते आहेत. यात बॉलिवूडही मागे राहिलेले नाही. बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने खुलासा केला, की द्रविड तिचा पहिला क्रश आहे.
-
रिचा नियमितपणे क्रिकेट पाहत नव्हती. कधीकधी फक्त द्रविडला पाहण्यासाठी तिच्या भावासोबत ती सामने पाहायची. द्रविड निवृत्त झाल्यावर रिचाने क्रिकेट पाहणे बंद केले होते. द्रविडने २०१२ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
-
टाइम्स ऑफ इंडियानच्या बातमीनुसार, रिचा म्हणाली, ”मी लहान असताना क्रिकेटची फार मोठा चाहती नव्हते. माझा भाऊ क्रिकेट खेळायचा. मीही टीव्हीवर सामने बघायची. मला द्रविडला खेळताना बघायला खूप आवडायचे. तो निवृत्त झाल्यानंतर मी क्रिकेट पाहणे बंद केले. माझे पहिले प्रेम राहुल द्रविड आहे.”
-
टी-२० विश्वचषक २०२१ संपल्यानंतर द्रविडने रवी शास्त्रींच्या जागी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. नवा टी-२० कप्तान रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा ३-० पराभव केला. याआधी द्रविडने जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यात ही जबाबदारी घेतली होती.
-
द्रविडला पुन्हा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये पाहून रिचाला खूप प्रोत्साहन मिळाले. ती म्हणाली, ”द्रविडच्या पुनरागमनामुळे मला क्रिकेटची आवड पुन्हा निर्माण झाली आहे. मी पुन्हा खेळ बघायला सुरुवात केली, कारण द्रविड परतला आहे.”
-
इनसाइड एज या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीजनमध्ये रिचा दिसणार आहे.

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल