-
जर एखादा खेळाडू भारतीय क्रिकेट संघाकडून खेळला, तर त्या खेळाडूला निश्चितच लोकप्रियता मिळते. पण त्या खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंबीयही चर्चेत येऊ लागतात. अशीच एक यादी भारतीय क्रिकेटपटूंच्या बहिणींची आहे, ज्या अनेकदा चर्चेत असतात.
-
श्रेष्टा अय्यर – श्रेष्टा ही पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकून नवा इतिहास रचणाऱ्या श्रेयस अय्यरची बहीण आहे. ती एक व्यावसायिक नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते. ती अनेकदा तिच्या स्टायलिश फोटोंसोबत डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. इंस्टाग्रामवर तिचे ४१ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
साक्षी पंत – ऋषभ पंतची बहीण साक्षीने एमबीए केले आहे, पण ती तिच्या सौंदर्य आणि शैलीसाठी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ग्लॅमरस लूक, तिची लाईफस्टाईल स्टारपेक्षा कमी नाही.
-
मालती चहर – मालती ही दीपक चहर आणि राहुल चहर यांची बहीण आहे. मालती व्यवसायाने मॉडेल आणि अभिनेत्री देखील आहे. तिने अनेक जाहिरात व्हिडिओ आणि वेब सीरिजमध्येही काम केले आहे. लवकरच ती एका तमिळ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
-
रितिका सचदेह – भारताचा टी-२० कर्णधार रोहित शर्माची पत्नी सिक्सर किंग युवराज सिंगची मानलेली बहीण आहे. युवराजने रोहित आणि रितिका यांची भेट घडवली होती, जिथून त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. रितिका आता एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. इंस्टाग्रामवर तिचे सुमारे २१ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल