-
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.
-
भारताचा वेगवान गोलंदाज आणि ‘लॉर्ड’ नावाने प्रसिद्ध असलेल्या शार्दुल ठाकुरने गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत मुंबईत साखरपुडा केला आहे.
-
दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हा सोहळा पार पडला.
-
या कार्यक्रमाला फक्त जवळचे कुटुंबीयच उपस्थित होते.
-
पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर हे दोघे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
-
शार्दुलवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
सध्या वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून शार्दुलला बीसीसीआयने विश्रांती दिली आहे.
-
शार्दुल टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे.
-
विशेषत: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत अर्धशतके झळकावून शार्दुलने फलंदाज म्हणूनही आपली ओळख मजबूत केली आहे.
-
शार्दुल ठाकूरच्या टीम चेन्नई सुपर किंग्जने ‘आयपीएल’ २०२१ चे विजेतेपद पटकावले.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य