-
राजस्थान रॉयल्सचा २८ वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू राहुल तेवतियाने रिद्धी पन्नूसोबत लग्नगाठ बांधली आहे.
-
या वर्षाच्या सुरुवातीला तेवतियाची फेब्रुवारी महिन्यात एंगेजमेंट झाली होती. आता तेवतियाने आपल्या फेसबुक अकाउंटवरून त्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.
-
राहुल-रिद्धीच्या लग्नाची वरात एकदम भव्य आणि शाही पद्धतीने काढण्यात आली होती.
-
या फोटोंमध्ये तो त्याची पत्नी, भारताचा अनुभवी फिरकीपटू यजुर्वेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मासोबत दिसत आहे.
-
चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्याशिवाय अनेक भारतीय खेळाडूही तेवतियाच्या लग्नाला पोहोचले होते. यामध्ये टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि नितीश राणासारख्या नावांचा समावेश आहे.
-
तेवतियाने आयपीएल २०२०च्या एका सामन्यात राजस्थानकडून खेळताना विरोधी गोलंदाजाच्या एका षटकात सलग पाच षटकार ठोकले होते. क्रिकेटच्या मैदानात या करिष्माई फलंदाजीनंतर तो रातोरात स्टार बनला.
-
आयपीएलमधील दमदार कामगिरीचे बक्षीस त्याला निळ्या जर्सीच्या रूपात मिळाले. यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याला सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
-
सध्या तेवतिया राजस्थान रॉयल्सचा महत्त्वाचा भाग आहे, परंतु फ्रेंचायझी त्याला पुढील हंगामात कायम ठेवते का, हे पाहणे बाकी आहे.
-
तेवतिया सध्या हरियाणासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. तेवतियाने २०१३-१४रणजी ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली.
-
आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने ४८ सामन्यात ३८ विकेट घेतल्या आहेत. त्यासोबतच त्याने १२४.३४ च्या स्ट्राईक रेटने ५२१ धावा केल्या. (सर्व फोटो इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावरून साभार)

पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त