-
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील म्हणजेच २०२२ च्या पर्वाआधी अनेक संघांनी आपल्या महत्वाच्या खेळाडूंनाही करार मुक्त केलं आहे.
-
करार मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंची नावं आहे. मुक्त करण्यात आलेल्या खेळाडूंना जानेवारीत होणाऱ्या भव्य लिलावप्रक्रियेत संघांना पुन्हा खरेदी करता येऊ शकेल. याच खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात…
-
के. एल. राहुलला पंजाब किंग्सच्या संघाने रिटेन केलेलं नाही.
-
के. एल. राहुल हा भारतीय संघातील महत्वाचा खेळाडू असून सालामीवीर म्हणून सध्या उत्तम कामगिरी करतोय.
-
के. एल. राहुल आयपीएलमध्ये ९४ सामने खेळाला आहे. तो एक उत्तम यष्टीरक्षकही आहे.
-
राहुलने ९४ सामन्यांमध्ये एकूण तीन हजार २७३ धावा केल्यात. ज्यात दोन शतकं आणि २७ अर्धशतकांचा सामावेश आहे.
-
आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या शिखर धवनलाही दिल्ली कॅपिटल्सने करार मुक्त केलंय.
-
धवनने या टी २० स्पर्धेत आतापर्यंत ५ हजार ७८४ धावा केल्यात.
-
सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीनंतर धवनचाच नंबर लागतो. विराटच्या नावावर सहा हजार २८३ धावा आहेत.
-
भारतीय संघांमध्ये नुकतेच पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरलाही दिल्लीच्या संघाने रिटेन केलेलं नाही.
-
श्रेयसने यापूर्वी दिल्लीच्या संघाचं नेतृत्वही केलं आहे.
-
अय्यरच्या नेतृत्वाखालीच दिल्लीचा संघ पहिल्यादा अंतिम सामन्यामध्ये पोहचला होता.
-
अय्यरने ८७ सामन्यांमध्ये २ हजार ३७५ धावा केल्या असून त्यामध्ये १६ अर्धशतकांचा समावेश आहे.
-
ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरलाही त्यांच्या सनरायझर्स हैदराबाद या संघाने रिटेन केलेलं नाही.
-
वॉर्नरने आयपीएलमध्ये १५० हून अधिक सामने खेळले असून त्याच्या नावावर ५ हजार ४४९ धावा आहेत.
-
वॉर्नरने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चार शतकं आणि ५० अर्धशतकं ठोकली आहेत.
-
अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही दिल्लीच्या संघाने रिटेन केलेलं नाही.
-
अश्विनने २०२१ च्या आयपीएलमधील १३ सामन्यांमध्ये सात गडी बाद केले होते. तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघांमध्ये आहे.
-
अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि यष्टीरक्षक इशान किशन यांना मुंबई संघाला मुक्त करावे लागले.
-
हार्दिकने अनेक वर्षे मुंबईसाठी विजयवीराची भूमिका बजावली.
-
मात्र, मागील काही काळात हार्दिकला कामगिरी सातत्य न राखल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आले.
-
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला सनरायझर्स हैदराबादने रिटेन केलेलं नाही.
-
आता राशिद खानवर लिलावामध्ये बोली लागणार आहे. राशिद खान हा जगभरामधील वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळतो.
-
रिटेन न केलेल्या पण कामगिरी दमदार असलेल्या या खेळाडूंना लिलावामध्ये मोठी किंमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. (सर्व फोटो सोशल मीडिया, ट्विटर, आयपीएल आणि बीसीसीआयवरुन साभार)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य