-
२०२१ हे वर्ष आता शेवटच्या टप्प्यावर आहे. कसोटी क्रिकेटसाठी हे वर्ष उत्तम ठरले. मात्र, हे वर्ष भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासाठी नीरस ठरले. पण दुसरीकडे, इंग्लंडचा कर्णधार जो रूट, भारताचा रोहित शर्मा यांच्यासाठी हे वर्ष खूप खास होते. आपण जाणून घेणार आहोत यंदा कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडणाऱ्या पाच क्रिकेटपटूंबद्दल.
-
रवीचंद्रन अश्विनने अष्टपैलू म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याने ऑस्ट्रेलियात आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवून सिडनी कसोटी अनिर्णित राखली. भारतात इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले आणि विकेटही घेतल्या. मात्र, इंग्लंड दौऱ्यावर त्याला इंग्लिश संघाविरुद्ध एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र यावर्षी खेळल्या गेलेल्या ८ कसोटींमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली. त्याच्या नावावर एकूण ५२ विकेट्स आहेत. यादरम्यान त्याने ३ वेळा डावात ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या.
-
भारताने आता रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्येही सलामीवीर म्हणून संधी दिली आहे आणि त्याने यंदा उत्कृष्ट खेळ दाखवून या ठिकाणी स्वत:ला सिद्ध केले आहे. रोहितने यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्येही कसोटी सामने खेळले आणि भारतातही त्याने सर्वत्र स्वत:ला सिद्ध करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. रोहितने यावर्षी ११ कसोटी सामने खेळले असून ४७.६ च्या सरासरीने ९०६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २ शतकांचाही समावेश आहे.
-
पाकिस्तानचा हसन अली यंदा खूप चर्चेत ठरला. तो त्याचा सहकारी गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या खांद्याला खांदा लावून खेळताना दिसला. ८ कसोटी खेळून या गोलंदाजाने एकूण ४१ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ वेळा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
-
इंग्लंडचा कर्णधार जो रूटसाठी हे वर्ष अप्रतिम ठरले. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने दोन द्विशतके झळकावली होती. त्याने श्रीलंकेत पहिले द्विशतक झळकावले आणि त्यानंतर भारत दौऱ्यावर येताच या पराक्रमाची पुनरावृत्ती केली. भारताविरुद्धही त्याने सलग तीन शतके झळकावण्याचा विक्रम केला. या वर्षात आतापर्यंत त्याने एकूण १२ कसोटी खेळून १४५५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण ६ शतके झळकावली आहेत. रूटचे वर्षाअखेरीस अॅशेस मालिकेतील दोन कसोटी सामने बाकी आहेत.
-
पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदी या युवा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने यावर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवले. तो पांढऱ्या चेंडूसोबतच लाल चेंडूच्या फॉरमॅटमध्येही चमकला आहे. यावर्षी त्याने एकूण ९ कसोटी सामने खेळले असून ४७ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. यादरम्यान त्याने ३ वेळा डावात ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या.
“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”