-
WWEची भारतात खूप लोकप्रियता आहे, म्हणूनच टीव्हीपासून डिजिटलपर्यंत त्याचे व्हिडिओ ट्रेंडमध्ये आहेत. WWE ही लोकप्रियता भारतात आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच WWE RAWमध्ये एका नव्या भारतीय कुस्तीपटूची एन्ट्री झाली आहे, जो आता सुपरस्टार होणार आहे. वीर महान असे त्याचे नाव आहे.
-
भारतीय वंशाचा वीर महानने WWE RAWमध्ये प्रवेश केला आहे. WWEनेच याची घोषणा केली.
-
वीर महानचे खरे नाव रिंकू सिंग आहे, त्याची उंची ६ फूट ४ इंच आणि वजन २७५ पौंड आहे.
-
रिंकू सिंगचा जन्म उत्तर प्रदेशातील गोपीगंज येथे झाला, त्यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. WWE रेसलिंगमध्ये सामील होण्यापूर्वी तो एक व्यावसायिक बेसबॉल खेळाडू होता. बेसबॉलमध्ये रिंकू सिंग पिचरच्या भूमिकेत दिसला. बराच काळ त्याने अमेरिकेच्या बेसबॉल लीगमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अपयश आले.
-
२०१८ मध्ये बेसबॉल सोडल्यानंतर, वीर महानने WWE मध्ये प्रवेश केला आणि येथे करारबद्ध झाला. सुरुवातीच्या काळात काही अडचणींनंतर, वीर महानला मुख्य रोस्टरमध्ये प्रवेश मिळाला, ज्यामध्ये जिंदर महल आणि शँकी सारख्या कुस्तीपटूंचाही समावेश होता.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती