-
भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार, विराट कोहली सध्या भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. त्याने फलंदाजी करताना आणि टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवताना देशाला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आहे.
-
याशिवाय, विराट अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसतो, ज्यांना त्याने मान्यता दिली आहे. विराट कोहली गेल्या वर्षी हॉपर इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये सर्वोच्च क्रमवारी असलेला भारतीय होता. इन्स्टाग्रामवर प्रत्येक प्रमोशनल पोस्टमधून तो ५ कोटींहून अधिक कमावतो.
-
२०२० मध्ये हॉपर इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये विराट कोहली २३व्या क्रमांकावर होता आणि आता तो १९व्या स्थानावर आला आहे. प्रियांका चोप्रा जोनास हॉपर ही इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये समाविष्ट केलेली एकमेव भारतीय सेलिब्रिटी आहे. प्रियांका जागतिक स्तरावर २७व्या क्रमांकावर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ६४ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाग्रामवरील प्रत्येक प्रमोशनल पोस्टमधून ती ३ कोटी रुपये कमवते.
-
विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर १७७ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि त्याची एकूण संपत्ती सुमारे ९५० कोटी रुपये आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे १३० कोटी आहे. विराट कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर बनला आहे.
-
२०२१ च्या याहूच्या इंडिया इयर-एंडर यादीमध्ये विराट कोहली सर्वाधिक सर्च केलेला क्रीडा व्यक्तिमत्व होता. ३३ वर्षीय विराटनंतर या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा यांचा समावेश आहे.
-
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, इंस्टाग्रामवर १५० मिलियन फॉलोअर्स गाठणारा विराट पहिला भारतीय क्रिकेटर आणि सेलिब्रिटी बनला. विराट कोहली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील A+ श्रेणीचा खेळाडू आहे. या श्रेणीतील खेळाडूंचे वार्षिक वेतन ७ कोटी रुपये आहे.

India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!