-
यश धूलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्यां भारतीय संघाने दोन दिवसांपूर्वी कॅरेबियन बेटांवर विजयपताका फडकवली.
-
अंतिम फेरीत इंग्लंडला नामोहरम करून त्यांनी पाचव्यांदा युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
-
भारताच्या या विजयानंतर मैदानाबरोबरच सोशल नेटवर्किंगवरही जंगी सेलिब्रेशन झाल्याचं पहायला मिळालं. अनेक सेलिब्रिटींपासून सर्व सामान्यांनी भारताच्या या यंग ब्रिगेडचं तोंड भरुन कौतुक केलं.
-
भारताच्या या यशात डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवाल, वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकर आणि अष्टपैलू कौशल तांबे या महाराष्ट्रातील त्रिकुटाने मोलाची भूमिका बजावली.
-
महाराष्ट्रातील याच मराठमोळ्या तरुणांनी विश्वविजेता होण्यासाठी भारतीय संघाचा हा प्रवास अधिक सुखकर केला.
-
मात्र संघाला सहज विजय मिळवून देणाऱ्या या तिघांचाही प्रवास हा फारच कष्टाचा राहिला आहे. त्यावरच टाकलेली ही नजर…
-
भारतासाठी स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणारा विकी हा चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर अकादमी येथे प्रशिक्षण घेतो.
-
एकेकाळी क्रिकेटसाठी लोणावळा ते मुंबई असा रोजचा प्रवास करणाऱ्या विकीच्या आयुष्याला मोहन जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे वेगळी दिशा लाभली.
-
‘‘विकीची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची गोलंदाजी पाहून फार आनंद झाला. तो फलंदाजीतही तितकाच उत्तम आहे. त्याच्या महाराष्ट्रात परतण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत,‘‘ असे जाधव म्हणाले.
-
विकीने त्याच्या गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केलं असून भविष्यात तो नक्कीच भारतीय संघात खेळताना दिसेल असं मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलंय.
-
वडिलांच्या निधनामुळे नैराश्यात गेलेल्या राजवर्धनला विश्वचषकात खेळण्याविषयी खात्रीही नव्हती.
-
परंतु प्रसाद कानडे यांच्या पी. के. पेस फाऊंडेशनने त्याला मानसिक स्थैर्य दिले आणि तेथून मग राजवर्धनने पुन्हा गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले.
-
‘‘करोनाच्या काळात जेव्हा राजवर्धनच्या वडिलांचे निधन झाले, त्यावेळी तो खूप खचला होता. परंतु विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवण्याच्या प्रेरणेने तो पुन्हा मैदानात परतला,” असं कानडे सांगतात.
-
“अतिशय शिस्तबद्ध असलेला राजवर्धन गोलंदाजीतील वेग आणि दडपणाखाली फटकेबाजी करण्याची कला यामुळे तुमचे लक्ष वेधून घेतो,’’ असे कानडे यांनी सांगितले.
-
जुन्नरच्या कौशलला या स्पर्धेत स्वत:चे कौशल्य दाखवण्याची सातत्याने संधी मिळाली नाही.
-
परंतु मिळालेल्या संधीत कौशलने छाप पाडण्याचा प्रयत्न केला. मगरपट्टातील आर्यन्स क्रिकेट अकादमीत हर्षद पाटील हे कौशलचे प्रशिक्षक आहेत.
-
‘‘कौशलने इंग्लंडविरुद्धच्या अंतिम फेरीत जेम्सचा निर्णायक क्षणी घेतलेला झेल सामन्याला कलाटणी देणारा ठरला,” असं पाटील सांगतात.
-
“या स्पर्धेत कौशल गोलंदाजीसाठी अधिक ओळखला गेला. परंतु फलंदाजीतही तो तितकाच प्रभावी आहे,’’ असे पाटील यांनी नमूद केले. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”