-
आयपीएलच्या १५ व्या पर्वासाठी मुंबई इंडियन्सने यंदाच्या पर्वातील सर्वात मोठी बोली लावत इशान किशनला विकत घेतलं आहे.
-
१२ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या दोन दिवसीय लिलावामध्ये इशानला मुंबईने १५.२५ कोटींची बोली लावत संघात घेतलंय.
-
मागील पर्वामध्येही इशान मुंबईच्या संघातच होता. मात्र संघाने त्याला रिटेन केलं नव्हतं.
-
इशानची बेस प्राइज दोन कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच त्याला बेस प्राइजपेक्षा सात पट अधिक रक्कम देत विकत घेण्यात आलंय.
-
मुंबईबरोबरच इतरही अनेक संघांनी इशानसाठी मोठी बोली लावली होती. मात्र मुंबईने या शर्यतीमध्ये बाजी मारली.
-
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोणत्याही लिलावात एखाद्या खेळाडूला १० कोटींहून अधिक किंमत देत विकत घेतलंय.
-
इशान पहिल्यांदा मुंबईकडून खेळलेला तेव्हा त्याला ६.२ कोटी रुपये मिळाले होते.
-
म्हणजेच इशानला यंदा ९ कोटी रुपये अधिक मिळालेत.
-
२३ वर्षीय इशान किशनचा टी-२० मधील दमदार फॉर्म या मोठ्या बोली मागील मुख्य कारण आहे.
-
इशानने १०४ खेळींमध्ये २८ च्या सरासरीने २ हजार २७६ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकं आणि १५ अर्धशकतांचा समावेश आहे. या विकेटकीपर फलंदाजाचा स्ट्राइक रेट १३५ इतका आहे.
-
टी-२० च्या हिशोबाने हा उत्तम स्ट्राइक रेट आहे. याचमुळे पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईने एवढी मोठी बोली लावत इशानला संघात घेतलंय.
-
इशान टी-२० विश्वचषकामध्येही भारतीय संघाचा भाग होता.
-
त्यानंतर दोन वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये रोहितसोबत सलामीवीर म्हणून खेळताना दिसलेला.
-
इशान किशनने आधीच मुंबई आपली आवडती टीम असल्याचं म्हटलं होतं. यंदा आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातच होण्याची शक्यता आहे.
-
इशान किशन हा आयपीएल लिलावामध्ये खरेदी करण्यात आलेला दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय.
-
यापूर्वीही अनेक खेळाडूंवर यंदा इशानवर लावण्यात आली त्याप्रकारे अनेपेक्षितपणे मोठी बोली लावण्यात आलीय.
-
पाहूयात आयपीएलच्या इतिहासामधील सर्वात महागड्या खेळाडूंची यादी.
-
सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे श्रेयस अय्यर.
-
अय्यरलाही यंदाच्या लिलावामध्ये तब्बल १२.२५ कोटींची बोली मिळालीय.
-
कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरला २०२२ च्या पर्वासाठी विकत घेतलं असून तो संघाचा संभाव्य कर्णधार असल्याचं सांगितलं जातं आहे.
-
या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहे दिनेश कार्तिक. कार्तिकला २०१४ च्या लिलावामध्ये जॅकपॉट लागला होता.
-
२०१४ मध्ये दिल्लीच्या संघाने कार्तिकला १२ कोटी ५० लाख देत संघात स्थान दिलेलं.
-
यंदाच्या म्हणजेच २०२२ च्या आयपीएलमध्ये मोठी बोली लागलेला आणखीन एक खेळाडू म्हणेज दीपक चाहर.
-
दिपक चाहरला १४ कोटींची बोली लावण्यात आलीय.
-
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने २०२२ च्या पर्वासाठी करारबद्ध केलंय.
-
२०१४ साली युवराज सिंगसाठी बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सने मोठी रक्कम मोजली होती.
-
आरसीबीने १४ कोटींना युवराजला विकत घेतलं होतं.
-
सर्वाधिक बोली लागलेला खेळाडूही युवराज सिंगच आहे.
-
मात्र युवराजसाठी ही सर्वाधिक बोली २०१४ मध्ये नाही तर २०१५ मध्ये लागली होती.
-
२०१५ च्या आयपीएल पर्वामध्ये दिल्लीच्या संघाने युवराजसाठी तब्बल १६ कोटी रुपये मोजले होते. (सर्व फोटो : बीसीसीआय, ट्विटर, पीटीआय आणि सोशल मीडियावरुन साभार)
![Ravi Shastri Said India Chances To Win Champions Trophy 2025 Will Be Decreased 30 Percent If Jasprit Bumrah Will Not Play](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-63.jpg?w=300&h=200&crop=1)
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत