-
अष्टपैलू खेळाडू तेवतियासाठी गुजरात टायटन्सने ९ कोटी मोजले.
-
भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवसाठी पंजाब आणि दिल्लीने बोली लावली. दिल्लीने कुलदीपला २ कोटींमध्ये संघात घेतले.
-
मुंबईसाठी खेळलेल्या राहुलसाठी मुंबई, हैदराबाद, पंजाब, राजस्थान आणि दिल्लीने बोली लावली. पंजाबने राहुलला ५.२५ कोटींमध्ये संघात सामील करून घेतले.
वेगवान गोलंदाज शिवम मावीसाठी केकेआरने ७.२५ कोटींची बोली लावली. -
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला २ कोटींमध्ये दिल्लीने आपल्या ताफ्यात सामील केले.
-
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज लखनऊ संघाने मार्क वूडसाठी ७.५० कोटी मोजले.
-
राजस्थानने रियानसाठी ३.८० कोटी मोजले.
-
हैदराबादने भुवनेश्वर कुमारला ४.२० कोटी देत पुन्हा आपल्या संघात घेतले.
-
वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरसाठी मोठी बोली लागली. चेन्नईसाठी खेळलेला शार्दुल ठाकूर आता दिल्लीसाठी खेळणार आहे. त्याच्यासाठी १०.७५ कोटींची बोली लागली.
-
टीम इंडियासाठी दमदार प्रदर्शन केलेला वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णासाठी लखनऊ संघाने सुरुवातीला बोली लावली. मात्र राजस्थानने त्याला १० कोटी देत आपल्या संघात सामील करून घेतले.
-
पंजाब, गुजरात आणि हैदराबादने अभिषेकसाठी बोली लावली. हैदराबादने ६.५० कोटींची बोली लावत अभिषेकला संघात घेतले.
-
कर्नाटकचा फलंदाज अभिनव सदारंगनीसाठी गुजरात संघाने २.६० कोटी मोजले.
-
स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरसाठी दिल्ली आणि हैदराबादने बोली लावली. त्यानंतर चेन्नई आणि राजस्थानही शर्यतीत उतरले. चेन्नईने १४ कोटी देत दीपकला आपल्या संघात घेतले.
-
न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनसाठी गुजरात टायटन्सने १० कोटी मोजले.
-
भारताचा स्टार फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलसाठी मोठी बोली लागली. राजस्थानने चहलला ६.५० कोटी देत आपल्या संघात सामील करून घेतले.
-
कमलेश नारकोटीसाठी दिल्ली आणि कोलकाताने बोली लावली. दिल्लीने त्याला १.१० कोटींमध्ये संघात दाखल केले.
-
फलंदाज राहुल त्रिपाठीसाठी जवळपास सर्वच फ्रेंचायझींनी बोली लावली. हैदराबादने त्याला ८.५० कोटींमध्ये संघात दाखल केले.
-
बेबी एबी म्हणून प्रसिद्ध झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविससाठी पंजाब, मुंबई आणि चेन्नईने बोली लावली. नुकत्याच झालेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये ब्रेविसने मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मुंबईने ब्रेविसला ३ कोटींमध्ये संघात दाखल केले.
-
मागील हंगामात फॉर्मात असलेला वेगवान गोलंदाज हर्षल पटेलसाठी आरसीबी, सीएसकेने बोली लावली. शेवटी आरसीबीने १०.७५ कोटींमध्ये त्याला संघात घेतले.
-
वेगवान गोलंदाज पॅट कमिन्ससाठी कोलकाता नाइट रायडर्सने बोलीची सुरुवात केली. गुजरात टायटन्सने कमिन्ससाठी बोली लावली. केकेआरने ७.२५ कोटींमध्ये कमिन्सला संघात घेतले.
-
सलामीवीर फलंदाज देवदत्तसाठी आरसीबी आणि सीएसकेने रस दाखवला. शेवटी राजस्थान रॉयल्सने ७.७५ कोटी देत राजस्थानने संघात घेतले आहे.
-
डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नजराजनसाठी हैदराबादने ४ कोटी मोजले.
-
हसरंगासाठी १०.७५ कोटींपासून पुन्हा बोली सुरू करण्यात आली. आरसीबीने हसरंगाला याच किमतीत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
-
सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सने सुरुवातीला बोली लावली. मुंबईला पंजाब किंग्जकडून टक्कर मिळाली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादनेही इशानसाठी रस दाखवला. पण मुंबईने १५.२५ कोटी देत इशानला संघात पुम्हा सामील करून घेतले.
-
नुकताच भारतासाठी खेळलेला अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डासाठी लखनऊ संघाने ५.७५ कोटींची बोली लावत संघात घेतले.
-
अनुभवी खेळाडू अंबाती रायुडूसाठी चेन्नईने बोली लावली. सीएसकेने त्याला ६.७५ कोटींची बोली लावत संघात घेतले.
-
शिखर धवनला किंग्ज इलेव्हन पंजाबनं ८.२५ कोटींना खरेदी केलं.
-
अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला लखनऊने ८.२५ कोटींच्या किमतीसह संघात दाखल करून घेतले.
-
डावखुरा फलंदाज नितीश राणासाठी सुरुवातीला आरसीबीने बोली लावली. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि केकेआरने जोर धरला. ८ कोटी देत केकेआरने त्याला संघात घेतले.
-
सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरसाठी ६.२५ कोटी देत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात सामील केले.
-
सुंदरची बेस प्राइजसाठी दीड कोटी होती. गुजरातने त्याच्यासाठी बोली लावली. शेवटी सनराजझर्स हैदराबादने त्याला ८.७५ कोटींसह आपल्या संघात सामील करून घेतले.
-
अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होसाठी चेन्नई सुपर किंग्जने बोली उघडली. ४.४० कोटी देत सीएसकेने त्याला संघात घेतले.
-
स्फोटक फलंदाज रॉयसाठी २ कोटी देत गुजरात टायटन्सने आपल्या संघात घेतले.
-
हेटमायरसाठी दिल्ली आणि राजस्थान संघाने चुरस दाखवली. शेवटी राजस्थान रॉयल्सने ८.५० कोटी देत हेटमायरला संघात घेतले.
-
धाकड सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकला ६.७५ कोटींची बोली लावत लखनऊ सुपर जायंट्सने संघात घेतले.
-
सनरायझर्स हैदराबादने मनीषसाठी बोलीची सुरुवात केली. लखनऊ सुपर जायंट्सने ४.६० कोटी देत मनीषला आपल्या संघात घेतले.
-
अष्टपैलू खेळाडू होल्डरला ८.७५ कोटींची बोली लागली. लखनऊ संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले.
-
विंडीजचा धाकड फलंदाज निकोलस पूरनसाठी सीएसके, केकेआर आणि हैदराबादचे बोली लावली. शेवटी हैदराबादने १०.७५ कोटी देत पूरनला आपल्या ताफ्यात सामील केले.
-
डु प्लेसिसला ७ कोटी देत आरसीबीने संघात घेतले.
-
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बोली उघडली. शमीला ६.२५ कोटी देत गुजरात टायटन्सने संघात घेतले
-
वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टसाठी सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने बोली लावली. राजस्थान रॉयल्सने ८ कोटी देत बोल्टला संघात घेतले.
-
बंगळुरूने अय्यरसाठी बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही रस दाखवला. शेवटी केकेआरने १२.२५ कोटींमध्ये अय्यरला संघात घेतले.
-
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोला ६.७५ कोटी देत पंजाब किंग्जने संघात सामील करून घेतले.
-
पंजाब संघाने ९.२५ कोटी इतक्या किमतीला रबाडाला संघात घेतले आहे.
-
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शसाठी दिल्ली कॅपिटल्सने ६.५० कोटी मोजले.
-
भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसाठी आरसीबी आणि चेन्नईने बोली लावली. आरसीबीने त्याला ५.५० कोटी देत संघात सामील करून घेतले.
-
धाकड फलंदाज शाहरुख खानसाठी चेन्नई, पंजाबने बोली लावली. ९ कोटींमध्ये शाहरुख पंजाबसाठी खेळेल.
-
रवीचंद्रन अश्विनला राजस्थान रॉयल्सनं ५ कोटी रुपये देऊन संघात घेतलं.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन