-
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार ग्लेन मॅक्सवेल लवकरच आपल्या भारतीय प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
-
ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
त्यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
तामिळ भाषेत असणारी ही पत्रिका पाहून अनेकजण कौतुक करत आहेत.
-
मॅक्सवेल आणि विनी २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
२०२० मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.
-
करोनामुळे त्यांच्या लग्नाचा मुहूर्त चुकला होता.
-
पण आता २७ मार्चला मेलबर्नमध्ये दोघेही भारतीय पद्धतीने विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
मूळची भारतीय असणारी विनी ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहे.
-
इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार ती एक फार्मासिस्ट आहे.
-
विनी मुळची भारतातील चेन्नईमधील असली तरी तिचा जन्म आणि शिक्षण ऑस्ट्रेलियात झालं आहे.
-
तिथेच तिने फार्मसीचं शिक्षण घेतलं.
-
विनीचे रमनचे वडील वेंकट रमन आणि आई विजयालक्ष्मी रमन तिच्या जन्माआधीच ऑस्ट्रेलियात वास्तव्याला गेले होते.
-
मॅक्सवेल आणि विनी यांचं लग्न पारंपारिक तामिळ ब्राह्मण पद्धतीने होणार आहे.
-
या लग्नात अनेक क्रिकेटर्स तसंच आंतरराष्ट्रीय पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
-
विनीची नातेवाईक नंदिनी सत्यमूर्ती यांनी केलेल्या ट्वीटनुसार, विनीच्या आई-वडिलांकडून तामिळ भाषेतील पत्रिका आपल्या संस्कृतीप्रती असलेला आदर दर्शवत आहे.
-
हिंदू पद्धतीने हा विवाह व्हावा यासाठी ते तयारी करत आहेत.
-
दरम्यान मॅक्सवेलच्या करिअरबद्दल बोलायचं गेल्यास फलंदाजीसोबत फिरकी गोलंदाज म्हणूनही तो प्रसिद्ध आहे.
-
आयपीएल २०२२ लिलावाआधी या अष्टपैलू खेळाडूला आरसीबीने ११ कोटींमध्ये रिटेन केलं होतं.
-
लग्नामुळे मॅक्सवेल आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
-
या लग्नासोबत अजून एक विदेशी खेळाडू भारताचा जावई होईल.
-
(Photos: Social Media)

पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त