-
कलात्मक फिरकीच्या बळावर जगातील नामांकित फलंदाजांची भंबेरी उडवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी लेग-स्पिनर शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे शुक्रवारी निधन झाले. तो ५२ वर्षांचा होता.
-
माजी यष्टीरक्षक-फलंदाज रॉडनी मार्शच्या मृत्यूनंतर २४ तासांतच ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला.
-
“थायलंडमधील कोह सामुई येथील निवासस्थानी वॉर्न कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले,” अशी माहिती त्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीने दिली आहे.
-
वॉर्नने २ जानेवारी १९९२ या दिवशी भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले.
-
त्यानंतर १५ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत वॉर्नने १४५ सामन्यांत ७०८ बळी मिळवले.
-
सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुथय्या मुरलीधरननंतर वॉर्नचा दुसरा क्रमांक लागतो.
-
जानेवारी २००७मध्ये इंग्लंडविरुद्ध तो अखेरचा कसोटी सामना खेळला.
-
अॅशेस मालिकेतील सर्वाधिक १९५ बळीसुद्धा वॉर्नच्या खात्यावर आहेत.
-
२४ मार्च १९९३ या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध वॉर्न पहिला एकदिवसीय सामना खेळला, तर १० जानेवारी २००५ या दिवशी आशियाई एकादश संघाविरुद्ध अखेरचा सामना खेळला.
-
१९४ एकदिवसीय सामन्यांत प्रतिनिधित्व करताना २९३ बळी त्याच्या खात्यावर होते.
-
वॉर्नने एकदिवसीय प्रकारात देशाचे नेतृत्वही सांभाळले होते.
-
१९९९मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेतेपदात वॉर्नचा सिंहाचा वाटा होता.
-
१९९४मध्ये ‘विस्डेन’चा वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार वॉर्नने पटकावला होता.
-
२००३मध्ये बंदी असलेल्या उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी वॉर्नवर बंदी घालण्यात आली होती.
-
ही बंदी उठल्यानंतर २००४ व २००५मध्ये ‘विस्डेन’चे वर्षांतील आघाडीच्या क्रिकेटपटूचे पुरस्कार पटकावत त्याने छाप पाडली.
-
२०००मध्ये शतकातील ‘विस्डेन’ने निवडलेल्या शतकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंमध्येही वॉर्नने स्थान मिळवले होते.
-
२००७पासून ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या क्रिकेट संघटनेने द्विराष्ट्रीय कसोटी मालिकेला वॉर्न-मुरलीधरन करंडक हे नाव दिले आहे.
-
जुलै २०१३मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली.
-
२०१३मध्ये ‘आयसीसी’ हॉल ऑफ फेममध्येही त्याचा समावेश झाला.
-
निवृत्तीनंतर कर्णधारपद आणि प्रशिक्षकपद भूषवताना राजस्थान रॉयल्सला पहिल्या ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावून दिले होते.
-
याशिवाय खेळाचे तंत्रशुद्ध विश्लेषण करण्याची क्षमता असल्यामुळे वॉर्नने क्रिकेट समालोचनही उत्तम केली.
-
(सर्व फोटो सौजन्य : शेन वॉर्न / इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं