-
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे.
-
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने नव्या पर्वासाठी नवी जर्सी समोर आणली आहे.
-
दिल्ली कॅपिटल्स संघाने नव्या हंगामासाठी नव्या जर्सीचे अनावरण केले आहे.
-
चेन्नई सुपर किंग्ज संघ नव्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. भारताचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीनं चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडे सोपवलं आहे.
-
कोलकाता नाइट रायडर्सने आपली नवीन जर्सी सर्वांसमोर आणली. यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद श्रेयस अय्यर भूषवणार आहे.
-
सनरायझर्स हैदराबादच्या नव्या जर्सीचे फोटो सध्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरताना दिसत आहेत.
-
राजस्थान रॉयल्सने नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून राजस्थानने ही जर्सी समोर आणली. राजस्थान रॉयल्सने २००८मध्ये आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले होते.
-
२०११ पासून आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ (आरसीबी) आयपीएलमध्ये दरवर्षी जर्सीच्या मध्यमातून सामाजिक संदेश देत आला आहे.
-
पंजाब किंग्जने मयंक अग्रवालला आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. मयंकच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ आयपीएल २०२२ मध्ये खेळणार आहे.
-
गुजरात टायटन्स संघ नव्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे गुजरात संघाचे नेतृत्व असेल तर आशिष नेहरा संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.
-
लखनऊ सुपरजायंट्सची ही जर्सी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. केएल राहुल लखनऊ फ्रेंचायझीचा कर्णधार असेल.
-
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत एकूण १० संघ आहेत. (सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)

“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन