-
आयपीएलच्या १५व्या हंगामाला आजपासून (२६ मार्च) सुरुवात होणार आहे.
-
यंदा आयपीएलचा थरार महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या शहरातील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
-
चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये आयपीएल २०२२चा पहिला सामना रंगणार आहे.
-
इंडियन प्रीमियर लीगमध्ये भारतीय फलंदाजांचा बोलबाला राहिलेला आहे.
-
आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त धावा करणाऱ्या टॉप ५ खेळाडूंमध्ये चार भारतीय क्रिकेटर्स आहेत.
-
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर सर्वात जास्त धावा करणाऱ्या टॉप ५ खेळाडूंमध्ये एकमेव विदेशी क्रिकेटर आहे.
-
वॉर्नरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १५० क्रिकेट सामने खेळले आहेत.
-
यामध्ये पाच शतक आणि ५० अर्धशतकांची खेळी करत ५ हजार ४४९ धावा केल्या आहेत.
-
आयपीएलमध्ये तीन वेळा ऑरेंज कॅप आपल्या नावावर करणारा डेव्हिड वॉर्नर सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
-
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात लायन्स या संघांसाठी उत्कृष्ट कामगिरी करणारा भारताचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना यामध्ये चौथ्या स्थानी आहे.
-
आयपीएलमध्ये २०५ क्रिकेट सामन्यांत रैनाने ५ हजार ५२८ धावा केल्या आहेत.
-
आयपीएलच्या १५व्या हंगामात सुरेश रैना फलंदाजी नाही तर कॉमेन्टरी करून क्रिकेटप्रेमींचं मनोरंजन करताना दिसणार आहे.
-
भारताचा हिटमॅन सर्वात जास्त धावा करणाऱ्या टॉप ५ खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानी आहे.
-
रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली आहे.
-
हिटमॅनने आयपीएल कारकिर्दीत २१३ क्रिकेट सामने खेळले आहेत.
-
यामध्ये एक शतक आणि ४० अर्धशतकांची खेळी करत ५ हजार ६११ धावा केल्या आहेत.
-
भारताचा धुरंधर फलंदाज शिखर धवन सगळ्यात जास्त धाव करण्याऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.
-
धवनने आयपीएलमध्ये १९२ क्रिकेट सामन्यांत दोन शतक आणि ४४ अर्धशतकांची खेळी केली आहे.
-
एकूण ५ हजार ७८४ धावा धवनने आयपीएलमध्ये केल्या आहेत.
-
आयपीएल कारकिर्दीत एकदाही संघाला जेतेपद मिळवून न देता आलेल्या कर्णधारांमध्ये विराट कोहलीचा देखील समावेश आहे.
-
परंतु कोहलीने सगळ्यात जास्त धावा करणाऱ्या टॉप ५ खेळाडूंमध्ये अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
-
कोहलीने आयपीएलमध्ये २०७ क्रिकेट सामने खेळले आहेत.
-
यामध्ये पाच शतक आणि ४२ अर्धशतकांची खेळी करत ६ हजार २८३ धावा केल्या आहेत.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

होळीच्या दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशींना मिळणार जबरदस्त धन लाभ, चंद्र-शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती