-
भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.
-
इंडियन क्रिकेट टीमच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर विराटने आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं कर्णधारपददेखील सोडलं.
-
विराट कोहलीच्या ब्रॅण्ड मुल्यातही मोठ्या प्रमाणात घट झालीये.
-
असं असलं तरी २०२१ वर्षात सर्वाधिक ब्रॅण्ड मूल्य असलेल्या देशातील टॉप ५ सेलिब्रिटींच्या यादीत विराट अव्वल स्थानी आहे.
-
तर कॅप्टन कूल माहीची क्रेझ अजूनही कायम आहे.
-
या यादीत क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी पाचव्या स्थानी आहे.
-
धोनीचे ब्रॅण्ड मूल्य ६१.२ मिलियन डॉलर इतके आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सर्वाधिक ब्रॅण्ड मूल्य असलेल्या देशातील टॉप ५ सेलिब्रिटींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
-
आलियाचं ब्रॅण्ड मूल्य ६८.१ मिलियन डॉलर इतके आहे.
-
सर्वाधिक ब्रॅण्ड मूल्य असलेल्या देशातील टॉप ५ सेलिब्रिटींच्या यादीत बॉलिवूडचा खिलाडी तिसऱ्या स्थानी आहे.
-
अभिनेता अक्षय कुमारचे ब्रॅण्ड मूल्य १३९.६ मिलियन डॉलर इतके आहे.
-
तर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
-
रणवीरचं ब्रॅण्ड मूल्य १५८.३ मिलियन डॉलर इतके आहे.
-
सर्वाधिक ब्रॅण्ड मूल्य असलेल्या देशातील टॉप ५ सेलिब्रिटींच्या यादीत क्रिकेटर विराट कोहलीने सलग पाचव्यांदा अव्वल स्थान कायम ठेवलं आहे.
-
२०२० वर्षाच्या तुलनेत कोहलीच्या ब्रॅण्ड मूल्यात घट झाली आहे.
-
कोहलीचे ब्रॅण्ड मूल्य १८५.७ मिलियन डॉलर इतके आहे.
-
भारतीय रुपयानुसार हे मूल्य १८ करोड रुपये इतके आहे.
-
गेल्या वर्षी हे मूल्य २३७.७ मिलियन डॉलर इतके होते. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य