-
साधारणत: वयाची ३५ वर्षे ओलांडल्यानंतर सर्व खेळाडू निवृत्तीचा विचार करू लागतात, पण इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये एक असा खेळाडूही पाहायला मिळतो ज्याने वयाच्या ४१ व्या वर्षी व्यावसायिक पदार्पण केले. (फोटो: PTI)
-
लेग स्पिनर प्रवीण तांबे यांची कहाणीही अशीच आहे, ज्या वयात सचिन तेंडुलकरने क्रिकेट कारकीर्द संपवली, त्याच वयात तांबे यांचा खरा प्रवास सुरू झाला. (फोटो: pravintambeg / Insatgram)
-
४१ व्या वर्षी केलेलं पदार्पण आणि त्यांच्यावर आलेल्या बायोपिकमुळे सध्या प्रवीण तांबे हे नाव सगळीकडे चर्चेत आलं आहे. (फोटो: @legytambe/ twitter)
-
लेगस्पिनर प्रवीण तांबे यांच्यावर बनलेला ‘कौन प्रवीण तांबे’ हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार अॅपवर १ एप्रिल रोजीच प्रदर्शित झाला आहे. (फोटो: @legytambe/ twitter)
-
प्रवीण तांबेची भूमिका श्रेयस तळपदेने केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केले आहे. (फोटो: Indian Express)
-
मुंबईचे रहिवासी असलेले प्रवीण तांबे यांने हिंमत, जिद्द आणि कधीही हार न मानता त्यांचे स्वप्न पूर्ण केले नसते तर ते सामान्य माणूसच राहिले असता. फोटो: @legytambe/ twitter)
-
तांबे यांना राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने संधी दिली होती. (फोटो: pravintambeg / Insatgram)
-
१९७१ (ऑक्टोबर 8) मध्ये जन्मलेल्या प्रवीण तांबे यांनी २०१३ मध्ये पहिल्यांदा व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांचे वय ४१ वर्षांपेक्षा जास्त होते. (फोटो: PTI)
-
तांबेने आपल्या पहिल्याच साखळी हंगामात आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. (फोटो: PTI)
-
प्रवीण तांबे यांनी वयाच्या ४१व्या वर्षापूर्वी कोणत्याही राज्यासाठी प्रथम श्रेणी (रणजी करंडक) सामना खेळला नाही हे देखील एक आश्चर्य आहे. (फोटो: @legytambe/ twitter)
-
२००० मध्ये तांबे यांना मुंबईच्या रणजी खेळाडूंमध्ये निश्चितच स्थान मिळाले, परंतु त्यांची संघात निवड झाली नाही. (फोटो: @legytambe/ twitter)
-
तांबे यांचा प्रवास बघून की ‘जे प्रयत्न करतात ते पराभूत होत नाहीत!’ ही ओळ खरी वाटते. (फोटो: pravintambeg / Insatgram)
-
तांबेने २०१३ साली दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध पहिला मोठा सामना खेळला, पण त्याच वर्षी त्याने चॅम्पियन्स लीगमधील आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले. (फोटो: @legytambe/ twitter)
-
ते तीन वर्षे राजस्थान संघात होते. २०१६ मध्ये गुजरात लायन्स आणि २०१७ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा ते भाग होते. (फोटो: PTI)
-
जेव्हा त्याची राजस्थान संघात पहिल्यांदा निवड झाली तेव्हा त्याच्या वयाची खूप चर्चा झाली. (फोटो: @legytambe/ twitter)
-
२०१४ मध्ये त्यांनी आपल्या कामगिरीने सगळ्यांची तोंड बंद केली आणि ‘वय हा फक्त एक आकडा आहे’ हे सिद्ध करून दाखवले. (फोटो: PTI)
-
प्रवीण तांबे हे पाच सामन्यांत ६.५० च्या इकॉनॉमी रेटने १२ विकेट घेऊन लीगमधील सर्वोत्तम गोलंदाज ठरले. आणि त्यांनी सुनील नरेन आणि आर. अश्विनसारख्या गोलंदाजाला पराभूत केल्यानंतर त्याला रणजी संघातही मुंबईतून बोलावणे आले. (फोटो: @legytambe/ twitter)
-
तांबे हे आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक करणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. (फोटो: pravintambeg / Insatgram)
-
या गोलंदाजाने २०१४ साली वयाच्या ४२ व्या वर्षी केकेआरविरुद्ध हा पराक्रम केला होता. (फोटो: PTI)
-
२०१४च्या आयपीएल सामन्यात कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्यांनी २ चेंडूत तीन खेळाडूंना बाद करत हॅट्ट्रिक घेतली होती. (फोटो: @legytambe/ twitter)
-
त्या सामन्यातील पहिल्या वाईड चेंडूवर मनीष पांडेला यष्टिचित केले आणि त्यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर युसूफ पठाण आणि रायन टेन डोईशे यांना बाद केले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर राजस्थानने केकेआरचा १० धावांनी पराभव केला. (फोटो: @legytambe/ twitter)
-
(फोटो: pravintambeg / Insatgram)
-
प्रवीण तांबे यांना आयपीएलच्या एका सीजनमध्ये बॅन करण्यात आलेलं.
-
आयपीएल २०२० मध्ये प्रवीण तांबेला कोलकाता नाईट रायडर्सने १३व्या हंगामासाठी विकत घेतले होते, पण ते खेळू शकले नाही. (फोटो: pravintambeg / Insatgram)
-
याचं कारण होतं की प्रवीण तांबे अबू धाबी टी १० लीगमधील त्यांचा सहभाग. (फोटो: pravintambeg / Insatgram)
-
त्यावेळी एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, “बीसीसीआयचे नियम स्पष्टपणे सांगतात की भारतीय खेळाडूने फक्त आयपीएलमध्ये खेळावे किंवा त्यांनी त्यापासून दूर राहून इतर देशांच्या लीगमध्ये खेळावे. त्यांचे नाव T10 लीगमध्ये पाठवणे आणि आता त्यांना आयपीएलचा भाग बनवणे हे स्पष्टपणे बीसीसीआयच्या नियमांच्या विरोधात असेल. त्यामुळे ते खेळू शकत नाही.” (फोटो: Twitter)
-
फिरकीपटू प्रवीण तांबे यांना त्या वेळी २० लाखांच्या मूळ किमतीत कोलकाता नाईट रायडर्सने निवडले होते. (फोटो: @legytambe/ twitter)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती