-
आयपीएलच्या १५व्या हंगामाच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतेय.
-
सगळ्यात जास्त धावा करणारा खेळाडू आयपीएलमधील ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतो.
-
ऑरेंज कॅप नावावर करण्यासाठी फलंदाज धुवांधार बॅटिंग करताना दिसत आहेत.
-
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त धावा करून पाच भारतीय खेळाडूंनी ऑरेंज कॅपवर आपलं नाव कोरलं आहे.
-
सचिन तेंडुलकर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऑरेंज कॅपवर नावावर करणारा पहिला भारतीय क्रिकेटर आहे.
-
२०१०च्या आयपीएलमध्ये १५ क्रिकेट सामन्यांत सचिनने एकूण ६१८ धावा केल्या होत्या. या हंगामात नाबाद ८९ धावांची खेळी करत सचिनने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती.
-
रॉबिन उथप्पा : आयपीएल २०१४च्या हंगामात सगळ्यात जास्त धावा करत रॉबिन उथप्पा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.
-
या हंगामात उथप्पाने १६ क्रिकेट सामन्यांत एकूण ६६० धावा केल्या होत्या.
-
विराट कोहली : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर विराट कोहलीने देखील ऑरेंज कॅप नावावर करण्याचा विक्रम केला होता.
-
२०१६च्या आयपीएल हंगामात १६ क्रिकेट सामन्यांत विराटने चार शतकांसोबत ९७३ धावांची खेळी करत ऑरेंज कॅप नावावर केली होती.
-
के एल राहुल : आयपीएल २०२०च्या हंगामात सगळ्यात जास्त धावा करणारा के एल राहुल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.
-
या हंगामात राहुलने १४ क्रिकेट सामन्यांत एकूण ६७० धावा केल्या होत्या.
-
ऑरेंज कॅप नावावर करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला होता.
-
ऋतुराज गायकवाड : २०२१ च्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून फलंदाजी करणाऱ्या ऋतुराजने दमदार खेळीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.
-
ऋतुराजने या हंगामात १६ क्रिकेट सामन्यांत एकूण ६३५ धावा करत ऑरेंज कॅप नावावर केली होती.(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल