-
आयीएल स्पर्धेत आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सची सगळीकडे चर्चा असते. या संघातील खेळाडूदेखील वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत येत असतात. या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार फलंदाजी करत ४८ चेंडूंमध्ये ८१ धावा केलेला इशान किशन तर सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. तो प्रसिद्ध मॉडेल आदिती हुंदियाला डेट करत असल्याचे म्हटले जातेय.
-
आदिती हुंदिया आणि इशान किशन मागील दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा. या चर्चेला मात्र अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. आदिती ही मुंबई इंडियन्सची चाहती असून मागील अनेक वर्षांपासून ती मुंबईसाठी मैदानात चिअर करताना झळकलेली आहे.
-
आदिती आयपीएल २०१९ च्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी चिअर करत असताना दिसली होती. तेव्हापासून ती चर्चेत आलेली आहे. आदिती हुंदिया एक प्रसिद्ध मॉडेल असून तिने आतापर्यंत अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकल्या आहेत.
-
आयपीएल २०१९ च्या अंतिम सामन्यादरम्यानचे तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. मॉडेल असलेल्या आदितीने तिच्या करिअरची सुरुवात मीस इंडिया २०१७ पासून केली. या स्पर्धेत तीने FBB कलर्स फेमिना मिस इंडिया राजस्थानचा खिताब मिळवला होता. आदितीने मिस राजस्थान २०१६ स्पर्धेत मीस ब्यूटीफुल आईज आणि मीस बॉडी ब्यूटीफुल असे खिताब मिळवले होते.
-
आदितीने २०१८ मध्ये मीस दिवा सौंदर्य स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर याच वर्षी तिने पोलंडमधील मीस सुपरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
-
आदितीचे विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी हे आवडते खेळाडू आहेत. पण ती इशान किशनसाठीदेखील चिअर करताना वेळोवेळी दिसते. इशान किशन आणि आदिती मागील दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते. या दोघांच्याही सोशल मीडियावर त्यांचे फोटो अनेकवेळा दिसलेले आहेत.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल