-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खराब कामगिरी केली आहे. या संघाने आतापर्यंत सलग चार सामने गमावले आहेत. पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या संघाची अशी दुर्दशा झाल्यामुळे या संघातील खेळाडूदेखील वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत येत आहेत. यातीलच बेबी एबी म्हणून ओळख असलेला देवाल्ड ब्रेविस एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. ब्रेविस आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
-
देवाल्ड ब्रेविसला मुंबई इंडियन्सने तीन कोटी रुपयांना खरेदी केले आहे. ब्रेविस पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत असून सध्या त्याची गर्लफ्रेड चांगलीच चर्चेत आलीय.
-
ब्रेविसच्या गर्लफ्रेंडचे नाव लिंडी मारी असून या दोघांचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
-
हे दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसलेले आहेत. लिंडी मारीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रेविससोबतचे अनेक फोटो पोस्ट केलेले आहेत.
-
वेगवेगळ्या ठिकाणी हे दोघेही अतिशय आनंदात दिसत असून या फोटोंमध्ये दोघांमध्ये असलेलं प्रेम दिसून येतंय. देवाल्ड ब्रेविसने दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सकडून प्रशिक्षण घेतलेले आहे.
-
ब्रेविसला खरेदी करण्यासाठी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जने बोली लावली होती. मात्र त्याला मुंबई इंडियन्सने ३ कोटी रुपयांना खरेदी केलेलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलंय.

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन