-
सध्या आयपीएलचा पंधऱावा हंगाम सुरु आहे. प्रत्येक हंगामात खेळाडू वेगवेगळे विक्रम रचतात. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात जवळपास ६०० पेक्षा जास्त षटकार लगावले जातात. आतापर्यंत भारताचे चार असे खेळाडू आहेत ज्यांनी २०० पेक्षा जास्त षटकार लगावलेले आहेत. यामध्ये पहिला क्रमांक येतो मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५५०० पेक्षा जास्त धावा केलेल्या असून आतापर्यंत आयपीएलमध्ये २३१ षटकार लगावलेले आहेत.
-
त्यानंतर चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा क्रमांक येतो. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत २२२ षटकार लगावलेले असून ४५०० पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत.
-
तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत २१२ षटकार लगावले आहेत. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६००० पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत.
-
चौथ्या क्रमांकावर मिस्टर आयपीएल म्हणून ओळख असलेला सुरेश रैना येतो. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर त्याने आयपीएलमध्ये २०३ षटकार लगावले आहेत.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं