-
आयपीएलमध्ये चांगला खेळ केल्यामुळे टीम इंडियामध्ये संधी मिळालेले अनेक खेळाडू आहेत. त्यामुळे नव्या दमाच्या क्रिकेटपटूंसाठी आयपीएल ही एक मोठी संधी असते. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातही अनेक खेळाडू सुरुवातीपासून चमकदार कामगिरी करत आहेत. या खेळाडूंनी अशीच खेळी केली तर आगामी कळात त्यांना टीम इंडियाचा भाग होता येऊ शकते. या शर्यतीमध्ये दिनेश कार्तिक प्रथम क्रमांकावर आहे. सध्या दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळत असून फलंदाजीमध्ये त्याने धमकेदार कामगिरी करुन दाखवली आहे. यष्टीरक्षक असलेल्या दिनेश कार्तिकने पंजाब किंग्जविरोधातील सामन्यात १४ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या होत्या. तर केकेआरसोबतच्या सामन्यात सात चेंडूमध्ये १४ धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सविरोधात खेळताना त्याने २३ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या आहेत.
-
यानंतर कुलदीप यादवदेखील आयपीएलच्या या पर्वामध्ये धमाकेदार गोलंदाजी करत आहे. सध्या तो दिल्लीकडून खेळत असून मुंबई इंडियन्सविरोधातील सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतलेल्या आहेत. तर गुजरात टायटन्सविरोधात खेळताना त्याला एक तर लखनऊ सुपर जायंट्सविरोधात खेळताना दोन विकेट घेता आल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरोधात खेळताना त्याने तब्बल चार गडी बाद केले होते.
-
दिल्ली कॅपिट्लसकडून खेळणारा पृथ्वी शॉदेखील सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरोधात खेळताना २४ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या होत्या. तर लखनऊ सुपर जायंट्सविरोधात खेळताना त्याने अवघ्या ३१ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या होत्या. कोलकाताविरोधात खेळताना दिल्लीने २९ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या होत्या.
-
पंजाब किंग्जकडून खेळणारा फिरकीपटू राहुल चहरदेखील सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. कोलकाताविरोधात खेळताना त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. तर चेन्नई सुपर किंग्जविरोधात खेळताना त्याने तीन फलंदाजांना बाद करत आठ चेंडूंमध्ये १२ धावा केल्या होत्या. गुजरात टायटन्सविरोधात खेळताना त्याने एक विकेट घेत १४ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या होत्या.
-
कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा उमेश यादवदेखील चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. चेन्नईविरोधात खेळताना त्याने दोन बळी घेतलेले आहे. तसेच बंगळुरुविरोधात खेळताना त्याने दोन विकेट्स घेतलेल्या आहेत. पंजाब किंग्जविरोधात खेळताना तर त्याने आक्रमक गोलंदाजी करत तब्बल चार विकेट्स घेतल्या होत्या.
-
चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा शिवम दुबे सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरोधात खेळताना त्याने ३० चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या होत्या. तर पंजाब किंग्जशी दोन हात करताना त्याने ३० चेंडूंमध्ये ५७ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधात खेळताना त्याचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले होते. त्याने ४६ चेंडूंमध्ये ९५ धावा केल्या होत्या.
-
गुजरात टायटन्सकडून खेळणारा शुभमन गिल्सदेखील आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चांगला खेळ करत आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना ४६ चेंडूंमध्ये ८४ धावा केल्या होत्या. तर पंजाब किंग्जविरोधात खेळताना त्याने ५९ चेंडूंमध्ये ९६ धावा केल्या होत्या.
-
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर हा खेळाडूदेखील चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने राजस्थान रॉयल्सविरोधात खेळताना १४ चेंडूंमध्ये चाळीस धावा केल्या होत्या. तर लखनऊ सुपर जायंट्सविरोधात खेळताना त्याने चौदा चेंडूंमध्ये अठरा धावा करत दोन विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नईशी दोन हात करताना त्याने दोन बळी घेतलेले आहेत. त्यामुळे टी-२० विश्वषकाच्या इंडियन टीममध्ये त्याला संधी मिळू शकते.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…