-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामामध्ये मुंबई इंडियन्स संघाचा सलग पाच सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. या हंगामात नव्याने आलेल्या दोन संघांनीदेखील मुंबईला मागे टाकलंय. आयपीएलच्या इतिहासात मुंबईसारखी स्थिती आणखी कोणत्या संघाची झालेली आहे ते जाणून घेऊया.
-
आयपीएल क्रिकेटमध्ये २०१२ साली डेक्कन चार्जेस या संघाची मुंबईसारखी स्थिती झाली होती. डेक्कन चार्जेस संघाने मुंबईसारखेच सलग चार सामने गमावले होते. एकूण १६ सामन्यांपैकी या संघाला फक्त चार सामने जिंकता आले होते.
-
यापूर्वी दिल्ली डेअरडेविल्स म्हणून ओळख असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचीही २०१३ साली अशीच स्थिती झाली होती. या संघाने २०१३ मध्ये सुरुवातीचे सहा सामने गमावले होते. तर या संघाला एकूण १६ सामन्यांपैकी फक्त ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता. २०१३ च्या आयपीएलमध्ये हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होता.
-
मुंबई इंडियन्सची यापूर्वी दोन वेळा अशीच दयनीय स्थिती राहिलेली आहे. २०१४ साली मुंबई संघाने एकापाठोपाठ सलग पाच सामने गमावले होते. मात्र यानंतर मुंबईने एकूण १४ सामन्यांपैकी सात सामने जिंकत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं.
-
२०१५ सालीदेखील मुंबईची अशीच स्थिती झाली होती. या हंगामात मुंबईने सलग चार सामने गमावले होते. तर एकूण १४ पैकी या संघाने ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. या वर्षी मुंबईने जेतेपद पटकावले होते.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचीदेखील २०१९ च्या हंगामात मुंबईसारखीच स्थिती झाली होती. या हंगामात बंगळुरुने सलग सहा सामने गमावल्यामुळे संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होता.
-
तर सध्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईची स्थिती दयनीय झाली आहे. मुंबईने सुरुवातीचे पाच सामने गमावले आहेत. सध्या हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”