-
भारताचा स्टार क्रिकेटर के. एल. राहुलचा आज ३०वा वाढदिवस आहे. राहुल त्याच्या दमदार खेळीसाठी ओळखला जातो.
-
आयपीएलमधील ‘लखनऊ सुपरजायंटस’ संघाचा राहुल कॅप्टन आहे.
-
राहुलच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करत आहे.
-
१६ एप्रिलला झालेल्या मुंबई इंडियन्स संघाविरुद्धच्या लढतीत राहुलने आयपीएलमधील त्याचे तिसरे शतक झळकावले.
-
क्रिकेटर के. एल. राहुलचे अनेक चाहते आहेत. परंतु मैदानाबाहेरही त्याची क्रेझ काही कमी नाही.
-
मैदानावरील खेळाप्रमाणेच राहुल त्याच्या स्टाइल, फॅशनसाठी ओळखला जातो.
-
अनेक मुलींचं क्रश असणाऱ्या राहुलची विकेट मात्र गर्लफ्रेण्ड अथिया शेट्टीने घेतली.
-
अथिया सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी आहे.
-
राहुल आणि अथिया एका मित्राद्वारे पहिल्यांदा एकमेकांना कार्यक्रमादरम्यान भेटले.
-
त्यानंतर त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. राहुल आणि अथिया पार्टी, कार्यक्रमात एकत्र दिसून आले होते.
-
एकमेकांना काही वेळ डेट केल्यानंतर आता अथिया आणि राहुल रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
राहुलने अथियाच्या वाढदिवशी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून खास पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.
-
तर अथिया अनेकदा राहुलला प्रोत्सहन देण्यासाठी स्टेडियममध्ये दिसून आली.
-
राहुल आणि अथिया सोशल मीडियावरून एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात.
-
(सर्व फोटो : के.एल. राहुल, अथिया शेट्टी / इन्स्टाग्राम)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का