-
अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांचे प्रेम लपून राहिलेले नाही. ही जोडी अनेक ठिकाणी सोबत दिसलेली आहे.
-
केएल राहुलचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने अथिया शेट्टीने केएल राहुलसोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
फोटो शेअर करत अथियाने केएल राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुझ्यासोबत कुठेही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,’ असं कॅप्शन अथियाने या फोटोंसोबत दिलं आहे.
-
तर दुसरीकडे मुलगी अथियाचे हे फोटो पाहून सुनिल शेट्टीनेदेखील खास कमेंट केली आहे. अथियाने शेअर केलेल्या या फोटोंवर सुनिल शेट्टीने काळ्या रंगाचे हार्ट इमोजी पोस्ट करत केएल राहुलला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
तर केएल राहुलनेदेखी लव्ह यू म्हणत दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याची एका प्रकारे कबुली दिली आहे. सध्या आयपीएलचे सामने सुरु आहेत.
-
या सामन्यात केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतोय. राहुलचा खेळ पाहण्यासाठी अथिया यापूर्वी मैदानात झळकलेली आहे.

Pahalgam Terror Attack : ‘नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीशी खोटं बोललो’, एटीव्ही ऑपरेटरने सांगितली आठवण; पाहा Video