-
आयपीएल क्रिकेट म्हटलं की धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीची पर्वणीच असते. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी वेगवेगळे विक्रम रचलेले आहेत.
-
आयपीएल क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये विराट कोहली प्रथम क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ६४०२ धावा केलेल्या आहेत. ३३ वर्षीय विराट कोहली २००८ पासून बंगळुरु संघाकडून खेळतो. त्याने बंगळुरु संघाचे कर्णधारपद भूषवलेले आहे.
-
आयपीएल क्रिकेटमध्ये शिखर धवनने आतापर्यंत ५९८९ धावा केलेल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत तो मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जेस, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिट्लस आणि पंजाब किंग्ज या संघांकडून खेळलेला आहे.
-
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार आणि सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळणारा रोहित शर्मा आयपीएल क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
-
रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५७२५ धावा केलेल्या आहेत. तो २००८ ते २०१० पर्यंत डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळलेला आहे. सध्या तो मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे.
-
मूळचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेविड वॉर्नर आयपीएल क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ५५०० धावा केलेल्या आहेत. सध्या तो सनरायझर्स दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतोय.
-
मिस्टर आयपीएल म्हणून ओळख असेलेला सुरेश रैना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पाचव्या स्थानी आहे. तो आयपीएलच्या पंधराव्या हंगामामध्ये खेळत नाहीये. तरीदेखील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो पाचव्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत ५५२८ धावा केलेल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जकडून तो खेळलेला आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”