-
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रविवारी (२४ एप्रिल) मुंबईत ४९वा वाढदिवस साजरा करत वयाच्या पन्नाशीत पदार्पण केले.
-
सचिनसोबत कन्या सारा तेंडुलकर…
-
२०० कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करून जवळपास नऊ वर्षे उलटली असली, तरी त्याच्याप्रति चाहत्यांचे प्रेम तिळभरही कमी झालेले नाही.
-
सचिनने रविवारी (२४ एप्रिल) मुंबई इंडियन्स vs लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली होती.
-
सचिनचे वानखेडे स्टेडियम हे सर्वात आवडते मैदान.
-
विशेष म्हणजे सचिन सध्या मुंबई इंडियन्स संघाच्या प्रेरकाची भूमिका बजावत आहे.
-
या सामन्यादरम्यान चाहत्यांनी सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि वानखेडेमध्ये ‘सचिन…सचिन…’चा नारा दुमदुमला.
-
काही दिवसांपूर्वीच मुंबईचा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामना झाला.
-
या सामन्यादरम्यान समालोचकांनी सचिनशी संवाद साधला. त्यांनी सचिनला तू आता वयस्कर होत चालला आहेस, असे गमतीत म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
त्यावेळी सचिननेही त्यांना मजेशीर उत्तर दिले. “मी ४९ वर्षांचा नाही. मी तर केवळ २० वर्षांचा आहे आणि माझ्या गाठीशी २९ वर्षांचा अनुभव आहे,” असे तो म्हणाला.
-
‘मास्टर ब्लास्टर’ अशी ख्याती मिळवलेल्या सचिनची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होते.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने (६६४), सर्वाधिक धावा (३४३५७), सर्वाधिक शतके (१००) आणि सर्वाधिक अर्धशतके (१६४) असे असंख्य विक्रम सचिनच्या नावावर आहेत.
-
या अलौकिक कामगिरीमुळेच २०१४मध्ये त्याला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आले होते.
-
सचिन हा आजही भारतातील अनेक खेळाडूंचा आदर्श आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सचिन तेंडुलकर / ट्विटर)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा