-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच लढती रोमहर्षक होत आहेत. मात्र आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला मुंबई इंडियन्स संघ या हंगामात कठीण काळातून जातोय.
-
या संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. मुंबईने आतापर्यंत सलग आठ सामने गमावले आहेत.
-
आयपीएलच्या इतिहासामध्ये याआधी अशीच खराब कामगिरी अनेक संघांनी केलेली आहे. २००९ च्या हंगामामध्ये केकेआर या संघाने नऊ सामने गमावले होते.
-
दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या नावावर अशाच प्रकारची खराब कामगिरी आहे. या संघाने २०१४ साली नऊ सामने गमावले होते.
-
पुणे वॉरियर्स इंडिया या संघानेही २०१२ साली खराब कामगिरी केली होती. या हंगामात पुणे संघाला नऊ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
दुबईतील वाळवंटात पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?