-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चौकार आणि षटकार यांचा अक्षरश: पाऊस पडतोय. प्रत्येक सामन्यात अटीतटीची लढत होत आहे. या हंगामात लखनऊचा केएल राहुल आणि राजस्थानचा जोस बटलर या दोघांनी धमाकेदार फलंदाजी करत शतके झळकावली आहेत.
-
मात्र एकाच हंगामात दोन किंवा दोनपेक्षा जास्त शतकं झळकावण्याची कामगिरी फक्त या दोन खेळाडूंनीच केलेली आहे, असे नाही. तर या दोघांव्यतिरिक्त असे अनेक फलंदाज आहेत, ज्यांनी आपयीएलच्या एकाच हंगामात दोन किंवा दोपेक्षा जास्त शतकं झळकावली आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर अर्थात विराट कोहली येतो.
-
विराट कोहलीने २०१६ च्या आयपीएलमध्ये ९७३ धावा केल्या होत्या. या हंगामात त्याने चार शतके झळकावली होती.
-
तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना ख्रिस गेलनेदेखील २०११ च्या आयपीएलमध्ये दोन शतके झळकावले होते. या हंगामात त्याने मालिकावीरचा खिताब मिळवला होता.
-
२०१७ च्या आयपीएलमध्ये किंग्ज ११ पंजाबकडून (पंजाब किंग्ज) खेळताना त्याने ४२० धावा करत हासीम आमलाने दोन शतकं झळकावली होती.
-
तसेच २०१८ च्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून खेळताना शेन वॉट्सन याने दोन शतकांची नोंद केली होती.
-
आयपीएलच्या २०२० मधील हंगामात दिल्ली कॅपिट्लसकडून खेळताना शिखर धवनने ६१८ धावा केल्या होत्या. या हंगामात त्याने दोन शतकं झळकावली होती.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा