-
आयपीएल २०२२ च्या सामन्यांमध्ये दिवसेंदिवस चुरस वाढत आहे. अशातच अनेक खेळाडू चमक दाखवत आहेत. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
सध्या सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकही असाच चर्चेतील खेळाडू आहे. त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
उमरान मलिकने १७ एप्रिलला पंजाब किंग्ज विरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करत २८ धावा देताना ४ विकेट घेतल्या. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
मलिकने ४ विकेटपैकी ३ विकेट तर अखेरच्या षटकात घेतल्या. असं करणारा आयपीएलच्या इतिहासातील तो चौथा खेळाडू आहे. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
याआधी लसिथ मलिंगा, जयदेव उनाडकट आणि इरफान पठाणने ही कामगिरी केली होती. आता या यादीत उमरान मलिकचाही समावेश झालाय. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
इरफानने २००८ मध्ये, लमिंगाने २००९ मध्ये आणि उनाडकटने २०१७ मध्ये हा विक्रम केला होता. आता मलिकने २०२२ मध्ये आपलं नाव या यादीत समाविष्ट केलं. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
मलिकच्या भेदक गोलंदाजीच्या जीवावरच हैदराबादने पंजाबचा पराभव केला. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
विशेष म्हणजे हैदराबादसाठी हा चौथा विजय होता. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
या विजयासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
बोल्ड कंटेंटमुळे थिएटरमध्ये प्रदर्शित न होऊ शकलेले ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी