-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सगळेच संघ स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
२७ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अटीतटीचा सामना खेळला गेला. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
दिल्लीचा कर्णधार आणि यष्टीरक्षक क्रिकेटर ऋषभ पंत याने क्षेत्ररक्षणात दिमाखदार कामगिरी केली.(फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
परंतु सामन्यादरम्यान लक्ष वेधलं ते ऋषभ पंतची गर्लफ्रेण्ड ईशा नेगी हिने.
-
ऋषभ पंतचा खेळ पाहण्यासाठी त्याची गर्लफ्रेण्ड ईशा नेगीने सामन्याला हजेरी लावली.
-
सामन्यादरम्यान ईशा नेगी ऋषभ पंतला चिअर करताना दिसली.
-
याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
ऋषभ पंत आणि ईशा नेगी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा अनेक काळापासून रंगल्या आहेत.
-
दोघांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही त्यांच्या नात्यांमधील जवळीक दिसून येते.
-
ईशा तिच्या ग्लॅमरस लूक आणि पोस्टसाठी नेहमीच चर्चेत असते.
-
ईशा ही मूळची देहरादूनची आहे.
-
तिचा जन्म २० फेब्रुवारी १९९७ रोजी एका उच्चभ्रू कुटुंबात झाला.
-
ईशा ही एका श्रीमंत अशा राजपूत कुटुंबातून आहे.
-
तिचे वडील यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत.
-
ईशाचे शालेय शिक्षण देहरादून मधील एका कॉन्व्हेंट शाळेत झाले आहे.
-
तिने नोएडाच्या अमिटी महाविद्यालयातून कला शाखेतील पदवी (B.A.) संपादन केली आहे.
-
ईशा इंटेरिअर डिझायनर असून तिने या विषयातील तंत्रशुद्ध शिक्षण घेतले आहे.
-
तसेच ती एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे.
-
ऋषभ पंत आणि ईशा नेगी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.
-
सामन्यादरम्यान ऋषभ पंतला चिअर करताना दिसल्यामुळे या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
-
(सर्व फोटो : ईशा नेगी/ इन्स्टाग्राम)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का