-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. मात्र या वर्षी नवख्या खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली आहे.
-
सध्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिक चर्चेचा विषय ठरतोय. त्याच्या भेदक माऱ्यासमोर फलंदाज तग धरू शकत नाहीयेत.
-
मलिकने ९ सामन्यांमध्ये आतापर्यंत १५ विकेट्स घेतलेल्या असून तो सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या स्पर्धेत टॉप पाचमध्ये आहे.
-
लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा मोहसीन खानदेखील चमकदार कामगिरी करताना दिसतोय. डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातोय. त्याने आतापर्यंत आठ विकेट्स घेतल्या आहेत.
-
चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा मुकेश चौधरीदेखील गोलंदाजी विभागात लक्षणीय कामगिरी करताना दिसतोय.
-
पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना बांधून ठेवण्यासाठी मुकेश चौधरी ओळखला जातोय. त्याने आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत.
-
लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा आवेश खान हा गोलंदाजही सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत.
-
सध्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा अभिषेक शर्मा हा फलंदाजही चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. शर्माने आतापर्यंत दहा सामन्यांत ३२४ धावा केल्या आहेत. सध्या तो १३४.४३ च्या स्ट्राईक रेटने धावा करताना दिसतोय.
-
मुंबई इंडियन्सकडू खेळणारा तिलक वर्मादेखील या हंगामात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने १३७.०५ च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत ३०७ धावा केल्या आहेत.

बुलढाण्यातील केस गळतीचे रहस्य उलगडले; रोजच्या आहारातील अन्न ठरतंय कारणीभूत, जाणून घ्या कारण