-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मूळचा वेस्ट इंडिजचा क्रिकेटपूट रोवमन पॉवेल धडाकेबाज कामगिरी करताना दिसतोय.
-
सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत असून त्याला दिल्ली फ्रेंचायचीने २.८० कोटी रुपयांना खरेदी केलेलं आहे.
-
सनरायझर्स हैदराबादविरोधात खेळताना त्याने ३५ चेंडूमध्ये ६७ धावा करत दिल्लीला विजय मिळवून दिला.
-
सध्या तो क्रिकेटमध्ये चमकत असला तरी त्याचा भूतकाळ संघर्षपूर्ण राहिलेला आहे.
-
रोवमन पॉवेलला एक छोटी बहीण आहे. तसेच त्याला वडील नसून त्याचा सांभाळ त्याच्या आईनेच केलेला आहे.
-
रोवमनची आई गर्भवती असताना त्याच्या वडिलांनी अबॉर्शन करण्याचा हट्ट धरला होता.
-
मात्र रोवमनच्या आईने गर्भपातास विरोध केला आणि रोवमनचा जन्म झाला.
-
ज्या मुलाला या जगात येण्याआधीच मारण्याचा प्रयत्न झाला. तोच आज रोवमन पॉवेलच्या रुपात त्याच्या देशाचे नाव मोठे करताना दिसतोय.
-
रोवमनचा त्याच्या आईनेच सांभाळ केलेला आहे. रोवमनला शिकवण्यासाठी त्याच्या आईने कपडे धुण्याचे काम केलेले आहे.
-
याच कारणामुळे रोवमन पॉवेल त्याची बहीण आणि आईवर खूप प्रेम करतो. त्याच्या आईलाच तो आपले वडील मानतो.
-
सर्व फोटो रोवमन पॉवेलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार…
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन