-
यंदाच्या आयपीएल (IPL 2022) हंगामात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना कोट्यावधी रुपये खर्च करून रिटेन करण्यात आलं.
-
मात्र, रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी बऱ्याच खेळाडूंची कामगिरी फ्लॉप ठरली. अशाच क्रिकेटर्सचा आढावा.
-
शाहरुख खानच्या KKR ने वेंकटेश अय्यरला ८ कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. मात्र, वेंकटेशला ना फलंदाजीत ना गोलंदाजीत चमक दाखवता आली.
-
केकेआरने वरुण चक्रवर्तीला ८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. मात्र, आतापर्यंत संपूर्ण हंगामात वरुणला प्रभावी खेळी करता आलेली नाही.
-
चेन्नई सुपर किंग्सने ऑलराऊंडर रविंद्र जडेजाला १६ कोटींमध्ये रिटेन केलं होतं. मात्र, संपूर्ण हंगामात जडेजा फॉर्ममध्ये दिसला नाही.
-
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला १६ कोटी रुपये खर्चून रिटेन केलं होतं. रोहितची कामगिरी देखील खराब राहिली.
-
किरोन पोलार्डला मुंबई इंडियन्सने ६ कोटी रुपयांना रिटेन केलं, मात्र हा व्यवहार संघासाठी महाग ठरला.
-
विराट कोहलीला आरसीबीने १५ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं. मात्र, विराट कोहली ऑऊट ऑफ फॉर्म असून त्याने खूप खराब खेळी केली.
-
आरसीबीने विराटसोबत ग्लेन मॅक्सवेलला ११ कोटी रुपयांना रिटेन केलं. मात्र, त्यालाही चांगली खेळी करता आली नाही.

बुलढाण्यातील केस गळतीचे रहस्य उलगडले; रोजच्या आहारातील अन्न ठरतंय कारणीभूत, जाणून घ्या कारण